Shravan Somvar 2022 Esakal
संस्कृती

Shravan Somvar 2022 : श्रावण सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' 4 उपाय ...

यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

हिंन्दू पंचांगातील पवित्र श्रावण महिना 29 जुलैपासून होणार आहे. श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय समजला जातो.

या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार येणार आहेत. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा (Mahadevachi Pooja) केल्याने भाविकांना अपेक्षित फळ मिळते अशी मान्यता आहे. या वर्षी श्रावणातील पहिला सोमवार (First Shravan Somvar) हा 1 ऑगस्ट रोजीच आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमच्या सगळ्या मनोकामना पुर्ण होऊन तुम्हाला अपेक्षित फळ प्राप्ती होऊ शकते.

भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा (Lord Shiva and Mata Parvati worship) केल्याने विवाहित महिलेला सौभाग्य लाभते आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

श्रावण महिन्यात करून पहा हे चार उपाय…

1) श्रावण महिन्यातील दर सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने घरातील सर्व दुःखापासून मुक्तता मिळते. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. त्यामुळे श्रावणातील सोमवार या तिथीला सकाळीच भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चना करावी.

2) श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराची पूजा करताना त्यांना चंदन, अक्षता, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे भगवान महादेव प्रसन्न होतात.

3) श्रावण सोमवारी 108 वेळा महामृत्युंजय मंत्राच (Mahamrityunjaya Mantra) जप करावा. या मंत्राचा जप केल्याने सर्व कष्ट दूर होतात.मनाला शांतता लाभते. श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करावे.तसेच तुम्हाला जर शक्य असेल तर महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्रांचे एक तरी झाड लावावे.

4) श्रावण सोमवारी भगवान शंकर यांना तूप, साखर आणि गव्हाचे पीठाचा नैव्यद्य अर्पण करावा. यानंतर धूप आणि दीप पेटवून महादेवाची आरती करावी आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावा. हा उपाय केल्याने महादेवाचा आशीर्वाद (Blessings OF Lord Shiva) मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

Nanded Crime : 21 वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार; तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही केला प्रयत्न

Latest Marathi News Live Update : फलटनमध्ये पोलिस ठाण्यासमोर सुष्मा अंधारेचा ठिय्या

SCROLL FOR NEXT