Shravan Somvar Vrat after 19 years adhik maas culture why the shravan month is 59 days long this year 8 mondays sakal
संस्कृती

Shravan Somvar Vrat : शुद्ध श्रावणच महत्त्वाचा; आठ नव्हे, चारच श्रावणी सोमवार

अधिक मासामुळे व्रतवैकल्यांबाबत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : या वर्षी श्रावण मासातच अधिक मास आला आहे. तब्बल १९ वर्षांनी असा योग येतो. यंदा आठ श्रावणी सोमवार असल्याबाबत काहींची संभ्रमावस्था आहे. तथापि, शुद्ध श्रावणातील चारच सोमवारी व्रतवैकल्ये करावीत, असे संबंधित तज्ज्ञ सांगतात.

अधिक मासामुळे यंदा दोन श्रावण महिने असतील. अधिक श्रावण मास व निज (शुद्ध) श्रावण मास. दोन्ही मिळून एकूण आठ सोमवार येतात. पहिला श्रावण महिना हा अधिक महिना असेल. त्यानंतर येणारा श्रावण महिना हा निज म्हणजेच शुद्ध श्रावण असेल.

दोन्ही श्रावण महिन्यांतील आठ सोमवार असले, तरीही शिवभक्तांनी केवळ निज श्रावण मासातील सोमवार (ता. २१ व २८ ऑगस्ट, तसेच ४ व ११ सप्टेंबर) व्रत करायचे आहे. निज श्रावणात सण साजरे करण्याची परंपरा आहे. तो कोणताही इंग्रजी महिना असला, तरीही अधिक श्रावणात सण साजरे केले जात नाहीत.

गटारी नव्हे, दीपान्वित अमावस्या

श्रावण सुरू होण्याच्या आधी दीपान्वित अमावस्या असते. तिला गटारी अमावस्या असे नाव सोयीनुसार ठेवण्यात आले. श्रावणामध्ये मांसाहार करता येत नसल्यामुळे बहुतेक लोक या दिवशी तो करतात. त्यामुळे या अमावस्येचे तसे नामकरण झाले. १७ जुलैला ही अमावस्या आहे.

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥ याप्रमाणे दिव्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. तथापि, काही जण या अमावस्येला वेगळे रूप देत आहेत.

श्रावणाविषयी...

१८ जुलै ते १६ ऑगस्ट ः अधिक श्रावण मास

१७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर ः निज श्रावण (शुद्ध)

अधिक मासात करावयाची व्रते

  • तीर्थयात्रा करावी

  • विष्णुयाग करता येतो

  • पंढरपूर येथे सप्ताह केला जातो

  • जावयाची पूजा, धोंडा वाण देणे

हे आहेत शुद्ध श्रावणातील सण

  • नागपंचमी - २१ ऑगस्ट

  • रक्षाबंधन - ३० ऑगस्ट

  • श्रीकृष्ण जन्माष्टमी - ६ सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT