Shravan Varad Lakshmi Vrat Esakal
संस्कृती

Shravan Varad Lakshmi Vrat : वरदलक्ष्मी व्रताची पूजा कशी करतात?

श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा-जिवंतिका पूजन केले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Lakshmi Vrat: शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत करतात.  श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा-जिवंतिका पूजन केले जाते. श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. यंदा शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी वरदलक्ष्मी व्रत केले जाईल.

वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात.या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. 

गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्‍यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे.श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

आता बघू या वरदलक्ष्मी व्रताची पूजा कशी करतात?

सुरुवातीला घराची साफसफाई करावी. शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपास करावा, असे सांगितले जाते. सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरावी. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

SCROLL FOR NEXT