Shravan Vinayak Chaturthi 2023  esakal
संस्कृती

Shravan Vinayak Chaturthi 2023 : विनायक चतुर्थीची पूजा केल्याने नेमके कोणते फायदे होतात?

श्रावण महिन्यात महादेवासोबत गणपतीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व धार्मिक मान्यतांमध्ये मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Vinayak4 Chaturthi 2023: श्रावण महिन्यात महादेवासोबत गणपतीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व धार्मिक मान्यतांमध्ये मानले जाते. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत केले जाते. शिव परिवाराच्या पूजेसाठी श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. श्रावणात विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. यंदा श्रावणातील विनायक चतुर्थीला 5 शुभ योग तयार होत असून या शुभ योगांमध्ये गणेशाची पूजा केली जाणार आहे.

अधिक श्रावण महिना संपून आता 17 ऑगस्टपासून निज श्रावण मासारंभ होत आहे. रविवार 20 ऑगस्टला विनायक चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने उपासकांना ज्ञान आणि बुद्धीचा आशीर्वाद मिळतो आणि गणेश घर धन-धान्याने भरतो. 

हिंदू पंचांगानुसार विनायक चतुर्थी 19 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल. 21 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजून 21 मिनिटांनी संपेल. अशाप्रकारे 20 ऑगस्ट रोजी विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. शास्त्राच्या नियमानुसार गणेशाची पूजा मध्यान्हाच्या वेळी केली जाते. पूजेचा शुभ मुहूर्त 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 26 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 58 मिनिटापर्यंत असेल.

श्रावणातील विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व काय आहे?

श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय आहे. गणेश हा शिवाचा पुत्र. श्रावणातील विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्यानं भगवान शिव आणि माता पार्वतीही प्रसन्न होते. हे व्रत केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते. यासोबतच सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. धन, सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

विनायक चतुर्थीची पूजा केल्याने नेमके कोणते फायदे होतात?

प्रथम पूज्य देवता श्रीगणेश आपल्या भक्तांचे संकट दूर करतात. धार्मिक मान्यतेनुसार, प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी गजाननाला समर्पित असते, तिला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी व्रत केल्यानं लंबोदर सर्व मनोकामना पूर्ण करतात. भगवान गणेश विनायक चतुर्थीचा उपवास करणार्‍यांना धन, शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद देतात. हिंदू धर्मात असे मानले जाते की, विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने अनेक प्रकारचे ग्रह दोषही दूर होतात, संकटे नाहीशी होतात आणि श्रीगणेशाची कृपा कायम राहते.

विनायक चतुर्थीला काय करू नये...

श्रावणच्या विनायक चतुर्थीला चंद्र पाहणे अशुभ मानले जाते. या दिवशी चंद्र दिसल्यास कोणत्याही प्रकारचा कलंक लागण्याची भीती असते, अशी धार्मिक धारणा आहे. त्यामुळे विनायक चतुर्थीला चंद्र पाहू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT