Spiritual Inspiration
Spiritual Inspiration esakal
संस्कृती

तुम्हाला देवाने खास कामासाठी निवडलंय का, तुम्ही कोण आहात? कसं ओळखाल जाणून घ्या...

धनश्री भावसार-बगाडे

What Is The Purpose Of Your Birth : आपण रोजच्या धकाधकीतून दमून जरा वेळ काढून शांत बसलो, की एक प्रश्न बहुतांश लोकांना नक्की पडतो. मी का जन्माला आलो आहे? माझ्या जन्माचा, जगण्याचा काय उद्देश आहे? मी कोण आहे? हे बहुतांश वेळा पडणारे प्रश्न अध्यात्मिकच असायला हवेत असे काही नाही. पण याचे उत्तर आणि मूळ मात्र अध्यात्मातच सापडते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वेदांचा अभ्यास केला तर एक गोष्ट कळते की, वेद थेट आपल्या प्रश्नांची उत्तर देत नाही. तर आपल्या आत निर्माण झालेल्या या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करतात.

मी कोण आहे, असा प्रश्न विचारल्यावर काही लोक अहम ब्रह्मास्मि असं उत्तर सहज देतात. पण हे उत्तर माहित असणं आणि ते जाणलेलं असणं यात प्रचंड फरक आहे. त्यामुळेच स्वतःला कसं जाणून घ्यावं हे ओळखणे फार गरजेचे आहे.

कसा घ्यावा स्वतःचा शोध?

स्वतःचा शोध घेण्यासाठी पहिले ज्ञान मिळवायला हवा. नवीन काही शिकण्यासाठी आधीचं पुसून पाटी कोरी करायला हवी. कारण संसारीक ज्ञान हे अध्यात्मिक शोधात कामी येत नाही. या दोन्हीत फार फरक असतो. संसारीक ज्ञान ते दाखवू शकत नाही जे अध्यात्मिक ज्ञान दाखवतं.

जस दिसतं तसं नसतं

वाईट लोक मोठ्या आणि प्रभावशाली पदांवर बसून लोकांना नियंत्रित करतात. पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, हे सर्व अवास्तव, खोटं आहे. धन, ऐश्वर्य, महागड्या गाड्या, महागडे खाणे हे सर्व खोटं एवढ्या चतूर, धूर्तपणे ठासून सांगितलं जातं की, तेच आपल्याला सत्य वाटू लागतं. जर असं नाही जगलो तर आपण समाजाबाहेर होऊ असं बिंबवलं जातं आणि मग आपण त्यांच्या नियंत्रणाखाली येतो.

बंधनं नाही तर मुक्त करतं ज्ञान

संसारीक, भौतिक ज्ञानाते भरलेले लोक इतरांना कंट्रोल करू पाहतात. त्यांना इतरांच्या आयुष्यात प्रकाश नाही तर अंधकार पसरवायचा असतो. आपल्या बंधनात इतरांना अडकवायचे असते. पण खरतर ज्ञान बंधनं घालण्याचं नाही तर मुक्त होण्याचा मार्ग दाखवतं. असत्य बंधनात अडकवतं आणि सत्य स्वतंत्रता देतं.

द चुझन वन

देवाला त्याची सारीच लेकरं प्रिय असतात. पण काही लोकांना त्याने काही खास कामांसाठी निवडलेलं असतं. पण बऱ्याच लोकांना हे माहितच नसतं. ते आपलं अप्रिय जीवन तसंच जगत असतात. तरीही या लोकांत काही खास गुण दिसून येतात. हे लोक साफ मनाचे, विनम्र, प्रेमळ, करुणेने भरलेले असतात. यांच्याकडे बरेच अध्यात्मिक आणि अलौकीक गिफ्ट्स असतात पण त्यांना माहित नसतं.

भारताला वरदान

या अज्ञानाच्या, भावनिक मानसिक काळोखातून बाहेर काढण्यासाठी भारतात असे अनेक अध्यात्मिक गुरू आहेत, जे आपल्याला मदतीचा हात देताता. त्या लोकांना माहितीये त्यांना कशासाठी निवडलं आहे. तशीच अलौकीक शक्ती प्रत्येकात असते. फक्त ती योग्य मार्गदर्शनात विकसित करणे हे काम आपल्यावर सोपवण्यात आलं आहे.

तुम्हाला निवडलं आहे का, कसं ओळखाल?

आपली निवड झाली आहे का, हे ओळखण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला जाणायला हवं. यासाठी कोणतेही सेट पॅरेमिटर्स नाहीत. किंवा एखाद्या आजाराचे लक्षणं असतात तसे काही लक्षणं नसतात. इतर सामान्य माणसांप्रमाणेच बाहेरून तुम्ही दिसतात. फरक असतो तर, तो आतून. त्यामुळे आतली शक्ती वाढली की, आपोआप या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला होतं. बाह्य जगापेक्षा आत लक्ष केंद्रीत करा. नकारात्मकता काढून सकारात्मकता वाढवा. इश्वराप्रती समर्पण ठेवा.

तुम्हाला इंट्युएशन मिळेल

या सगळ्यातून तुम्हाला एक गट फिलींग मिळेल. तुम्ही निवडले गेले आहात याचे इंट्युएशन मिळेल. आजवरचे कष्ट, त्रास, अनुभव सारं काही या मिशनसाठी होतं, जे तुम्हाला तयार करत होतं. जे जे काही घडलं ते तुम्हाला या अध्यात्मिक मार्गावर आणण्यासाठी याची जाणीव होईल. तुमच्या आतूनच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळत जातील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Dindori Lok Sabha Election 2024 : 'मविआ'ला मोठा दिलासा! दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

SCROLL FOR NEXT