Spiritual Science esakal
संस्कृती

Spiritual Science : हात वर करून हर हर महादेव का म्हणतात माहितीये? हे आहे शास्त्रीय कारण

बऱ्याचदा जयजयकार हात वर करून केला जातो. यामागे मोठे शास्त्रीय कारण आहे, जाणून घ्या.

धनश्री भावसार-बगाडे

Spiritual Science About Taking Hands Up While Jay Jaykar : हिंदू धर्मात देवी देवता, साधू संतांचे जयजयकार करताना हात वर करण्याची पद्धत आहे. हर हर महादेव म्हणतांना सर्वजण हात वर करतात. असे करण्यामागे काय कारण आहे याचा कधी विचार केला आहे का? पण अध्यात्मातल्या प्रत्येक गोष्टीला काही शास्त्रीय आधार असतात. ज्याचा संबंध सकारात्मकतेशी जोडलेला आहे.

असाच संबंध या हात वर करून जयजयकार कराण्याच्या कृतीचाही आहे. यातून मिळणारी सकारात्मकता ही तुमच्या शरीर आणि मनावर फार परिणामकारक असते. याविषयीची माहिती सोशल मीडियावरील सायबर झील या पेजवर स्वर योगी यांनी एका पोस्टमध्ये दिली आहे.

यात त्यांनी सांगितलं आहे की, जर नकारात्मक विचार, टेंशन याचं ओझं आपल्या डोक्यावर असेल तर या कृतीने ते हलकं करणं आपल्याला शक्य आहे. कारण या कृतीचा संबंध थेट आपल्या मेंदूशी आहे. कारण ही प्रक्रिया म्हणजे भस्रीका प्राणायामाचा छोटासा प्रकार आहे.

मनातली, डोक्यातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी स्वर योगी याविषयीचा एक प्रयोग सांगतात करायला, पाठीचा कणा ताठ ठेवा आणि हाताची बोट ताठ करत मांडीवरून हळूहळू श्वास घेत वर करा. डोळे बंद असावे. हात वर गेल्यावर असा विचार करावा की, बोटांमधून काहीतरी आपल्या शरीरात शिरत आहे, अर्थात सकारात्मक उर्जा शरीरात जात आहे. थोड्यावेळ तसेच थांबा.

नंतर श्वास सोडत हात खाली आणा आणि नंतर झटका. म्हणजे डोक्यातला सर्व ताण निघून हलकं हलकं झाल्याची जाणीव तुम्हाला होईल असं त्यांनी यात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

जी राम जी! विधेयकामुळे राज्यावर आर्थिक भार, आधीच तिजोरीवर ताण त्यात आणखी खर्च वाढणार

Drugs Seized : साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुण्यासह पिंपरी, मुंबई, गोव्यात कारवाई; पाच जणांना अटक

शिल्पकलेचे 'भीष्माचार्य' हरपले! पद्मभूषण राम सुतार यांचं निधन

Driving License : वाहन परवान्यासाठी आता ‘जागते रहो’; रात्री एक वाजता स्लॉट खुले, संख्या कमी केल्याने अडचण

SCROLL FOR NEXT