Study Room Vastu Tips google
संस्कृती

Study Room Vastu Tips: परीक्षेत यश मिळवण्यासाठी अशी सजवा स्टडी रूम

अनेक पालक अनेकदा तक्रार करतात की त्यांच्या मुलाचे मन अभ्यासात केंद्रित नाही.

नमिता धुरी

Study Room Vastu Tips: प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी नेहमीच असते. मुलाला सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. जेणेकरून त्यांच्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे. तथापि, अनेक पालक अनेकदा तक्रार करतात की त्यांच्या मुलाचे मन अभ्यासात केंद्रित नाही.

जर तुमच्या मुलाला अभ्यास करायला आवडत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाच्या खोलीतील वास्तू दोषामुळेही असे होऊ शकते. वास्तूनुसार, अभ्यासाच्या खोलीत अभ्यासाशी संबंधित काही वास्तू दोष असल्यास, मुलाचे मन एकाग्र होऊ शकत नाही ज्यामुळे तो चांगला अभ्यास करू शकत नाही. चला जाणून घेऊ या वास्तुशास्त्रानुसार मुलाची अभ्यासिका कशी असावी.

वास्तूनुसार घरातील स्टडी रूम नैऋत्य दिशेला असावी. याशिवाय अभ्यासाची खोली पूर्व-उत्तर दिशेला ठेवल्याने सूर्य, बुध आणि गुरूचे आशीर्वाद नेहमीच मिळतात. स्टडी रूममधील टेबलचा आकार चौरस आणि आयताकृती असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागते.

सकाळी सूर्याची किरणे अभ्यासाच्या खोलीत आल्यास सकाळी खिडक्या-दारे उघडी ठेवावीत. त्यामुळे सकाळच्या सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचा फायदा होऊ शकतो. घराच्या पश्चिम दिशेला अभ्यासाची खोली असल्यास मुलांनी पूर्वेकडे तोंड करून अभ्यास करावा. असे केल्याने मूल परीक्षेच्या दिवसांत कमी वेळात जास्त गोष्टी लक्षात ठेवू शकतो आणि परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतो.

अभ्यास करणाऱ्या मुलांनी नेहमी दक्षिण किंवा पश्चिमेकडे डोके ठेवून झोपावे. दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपल्याने आरोग्याला फायदा होतो आणि पश्चिमेला डोके ठेवून झोपल्याने अभ्यासाची इच्छा दिवसेंदिवस वाढते.

अभ्यासाच्या खोलीत सरस्वतीचे चित्र ठेवा आणि तिच्यासमोर अभ्यास करण्यापूर्वी हात जोडून बुद्धी आणि शक्तीसाठी प्रार्थना करा. त्याच बरोबर सकाळी ओम ऊँ हि सरस्वत्याय नमः चा जप करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT