संस्कृती

Surya Grahan : कंकणाकृती सूर्यग्रहण नेमके कुठे दिसणार? इथे वाचा सविस्तर

हे सूर्यग्रहण कोणत्या वेळेत आणि नेमके कुठे दिसणार आहे ते जाणून घेऊया

गौरव देशपांडे

Surya Grahan : भाद्रपद अमावास्या अर्थात शनिवार दि. 14 ॲाक्टोबर 2023 रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण जगातील वेगवेगळ्या भागांत दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कोणत्या वेळेत आणि नेमके कुठे दिसणार आहे ते जाणून घेऊया.

भारत सोडून हे सूर्यग्रहण अमेरिकेतील टेक्सास,वॅाशिंग्टन डिसी, लॉस एंजेलस, मेक्सिको, पनामा, ब्राझील, कॅनडा, क्युबा इ. ठिकाणी दृश्यमान होणार आहे.

वॅाशिंग्टन डिसी येथील ग्रहणाचे गणित केल्यास या ठिकाणी खंडग्रास स्वरूपात हे सूर्यग्रहण दिसणार असून या ग्रहणात सूर्यबिंबाचे ग्रासमान 5 अंगुल 0 व्यंगुल इतके असणार आहे.

वॅाशिंग्टन डिसी येथील स्पर्श मोक्ष वेळा पुढीलप्रमाणे -

14 ॲाक्टोबर 2023 रोजी

ग्रहणस्पर्श- दुपारी 12:00 EDT, ग्रहणमध्य- दुपारी 01:19 EDT ग्रहणमोक्ष- दुपारी 02:39

भारतीय प्रमाणवेळेनुसार या ग्रहणाचा प्रारंभ दि. 14 ॲाक्टोबर 2023 च्या रात्री 08:34 वाजता होत असून ग्रहणमध्य रा.11:29 वाजता व मोक्ष रा.02:25 वाजता होणार आहे.

भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे भारतातील जनतेने व गर्भवती महिलांनी ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत तसेच या ग्रहणाचे नैसर्गिक व राशी इत्यादीनुसार होणारे परिणाम ग्रहण न दिसणाऱ्या प्रदेशात विचारात घेऊ नयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shops Rules: सोसायटीच्या संमतीशिवाय दारू विक्रीचं दुकान उघडता येणार नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा आदेश काय?

५,२२० एसटी गाड्यांंसह ४२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन, गौरी-गणपतीसाठी प्रशासनाचा निर्णय; विशेष सवलतींचीही घोषणा

IND vs SL Test: आता न्याय मिळणार... साई सुदर्शनच्या माघारीमुळे 'त्या' फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री होणार? त्याच्या पोस्टने उडवलेली खळबळ

IND vs SL Test : आधी जसप्रीत बुमराह, आता...! भारताच्या तगड्या फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार; मागील दोन सामन्यांत ठोकलेय शतकं...

सासूबाईंमुळेच मी माझ्या मुलीला डे केअरमध्ये ठेवत नाही... मृणाल दुसानिसने स्पष्टच सांगितलं; म्हणते- त्या नुरवीला

SCROLL FOR NEXT