Swami Samarth Prakat Din 2022 An experience sakal
संस्कृती

स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष : 'श्रीस्वामी मठ' एक अनुभूती

'तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे श्रीस्वामी समर्थांचे ब्रिदवाक्य

सकाळ वृत्तसेवा

'तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे श्रीस्वामी समर्थांचे ब्रिदवाक्य. श्रीस्वामींनी लौकिकार्थाने जनकल्याणार्थ धारण केलेला मानव देह त्यागतेवेळी जनसागराला अभिवचन दिले त्याची प्रचिती आजही स्वामी भक्तांना येत आहे. श्रीस्वामी कृपेची जिवंत अनुभूती म्हणजेच पं. मालवीयनगर, खामला, नागपूर येथे श्रीस्वामी इच्छेने उभा झालेला 'श्रीस्वामी मठ'. श्रीस्वामीमठाची स्थापना २००७ सालच्या श्रीस्वामी समर्थ प्रगटदिनी चैत्र शुद्ध द्वितीयेला झाली. श्रीस्वामी मठात दर गुरुवारी संध्याकाळी ७.०० वाजता मठस्थापनेपासून श्रीस्वामी उपासना सुरू आहे. श्रीस्वामी मठामध्ये

वर्षभरात प्रामुख्याने प्रगटदिन, निजानंदमग्नदिन गुरुपौर्णिमा

व नामजपयज्ञ असे चार कार्यक्रम होतात.

श्रीस्वामी मठामध्ये श्रीस्वामी भक्तांच्या नित्य उपासना व साधनेमुळे अत्यंत सकारात्मक अशी दैवी ऊर्जा निर्माण होत असते व जे भाविकजन श्रीस्वामींपुढे नतमस्तक होऊन प्रदक्षिणा घालतात ते अशा दैवी ऊर्जेच्या संपर्कात येऊन अनेक प्रकारच्या अनुभूती आल्या व येत आहेत. हा श्रीस्वामीकृपेचाच महिमा आहे.

एक साधिका अपर्णा वाघमारे

यांना कर्करोगासारख्या असाध्य रोगाने ग्रासले होते. त्या डॉक्टरी उपाय सुरू असतानाच श्रीस्वामी मठाच्या संपर्कात येऊन नित्यनेमाने श्रीस्वामीची सेवा करीत होत्या. आज श्रीस्वामीकृपेने त्यांचा असाध्य आजार बरा झाला असून, त्या पूर्वीप्रमाणे तंदुरुस्तीने नोकरी, घर सांभाळत आहे. त्यांचे डॉक्टरही आश्चर्य व्यक्त करतात.

माझासुद्धा चंद्रपूर येथे असताना १५ डिसेंबर १९९९ ला मोठा अपघात झाला. तेव्हापासूनच मी श्रीस्वामीसेवेत आलो. तद्नंतर शासकीय सेवेच्या संध्याकालात माझ्यावर नोकरीवर फार मोठे गंडांतर आले होते. तथापि, मी आधीपासूनच श्रीस्वामीसेवेत

असल्याने श्रीस्वामींनी त्यातून यथावकाश माझी सुटका केली. आज मी सेवानिवृत्ती पश्चात कालावधी श्रीस्वामी मठात स्वामीसेवेत मन:शांततेत व्यतीत करीत आहे.

श्रीस्वामी मठात येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने मठात येणाऱ्या भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येकाने श्रीस्वामी मठात येऊनच श्रीस्वामीकृपेची अनुभूती घ्यावी. म्हणूनच 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती'.

॥ श्री अक्कलकोटस्वामींची आरती ॥

जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था।

आरती ओवाळू चरर्णी ठेवुनियां माथा ॥धृ॥

छेली-खेडेग्रामीं तू अवतरलासी॥

जय उद्धारासाठी राया तू फिरसी॥

भक्तवत्सल खरा तू एक होसी।

म्हणूनी शरण आलों तुझे चरणासी॥ जय ॥1॥

त्रैगुण परब्रम्ह तूझा अवतार।

त्याची काय वर्णूं, लीला पामर॥

शेषादिक शिणले नगले त्या पार ॥

तेथें जडमूढ कैसा करु मी विस्तार ॥ जय ॥2॥

देवाधिदेवा तू स्वामीराया ।

निर्जर मुनिजन ध्याति भावें तव पाया ॥

तुजसी अर्पण केली आपुली ही काया।

शरणागता तारी तू स्वामीराया ॥ जय ॥3॥

अघटित लीला करुनी जडमूढ उद्धारिले।

कीर्ती ऐकूनि कानीं चरणीं मी लोळे ॥

चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवलें॥

तुझ्या सुता नलगे चरणां वेगळें ॥ जय ॥4॥

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘ओबीसीं’साठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

Jalgaon News : जळगाव लवकरच महाराष्ट्राची 'ऊर्जा राजधानी'; जिल्हा प्रशासनाचा दावा

Latest Maharashtra News Updates : पक्ष एकसंघ आहे, पक्षाची भूमिका स्पष्ट आहे- तटकरे

गुलशन कुमार विनवणी करत राहिले पण गँगस्टर्सनी जीव घेतलाच; 'या' संगीतकाराच्या ईर्ष्येने कुटूंब उद्ध्वस्त !

NCP Meeting : भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक; नेमकी काय झाली चर्चा? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT