Tulsi Vivah esakal
संस्कृती

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात 'ही' झाडे लावा, घरात राहिल सदैव पैसाच पैसा

उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो

सकाळ डिजिटल टीम

आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

हिंदू धर्मात तुलसी विवाह विशेष महत्त्व आहे. यावर्षी पाच नोव्हेंबर 2022 पासून तुलसी विवाहाच्या मुहूर्त सुरुवात होत आहे. असे मानले जाते की, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या शालिग्राम जिचा विवाह माता तुळशीची विधीवत विवाह करतात. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. तुलसी विवाह दरम्यान घरात 'ही' झाडे लावली तर घरात सदैव पैसाच पैसा राहील.

1) तुळशीचे रोप 

तुळशीचे रोप घरासाठी अतिशय शुभ मानले जाते आणि विष्णूचे प्रिय म्हणून पूजले जाते. तुळशीविवाहाच्या दिवशी ही वनस्पती घरात ठेवणे महत्वाचे असते. असे सांगितले जाते की, जर तुमच्या घरात हे रोप नसेल तर या दिवशी जरुर लावा आणि नियमानुसार त्याची पूजा करा. यानंतर नियमितपणे माता तुळशीला जल अर्पण करुन तिच्यासमोर दिवा लावावा. यामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि देवी लक्ष्मीची कृपाही कायम राहते, यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 

2) शमी वनस्पती 

तुळशीच्या पूजेला शमीचे रोपाला महत्व आहे. घरामध्ये शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. हे रोप सहसा शनिवारी लावले जाते. कारण ते शनिदेवाचे रोप मानले जाते, परंतु तुळशी विवाहाच्या दिवशी घरात शमीचे रोप लावले तरी तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि शनीदेवाची कृपा प्राप्त होते. मात्र, हे रोप घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला असेल अशा ठिकाणी लावावे. हे रोप घरात लावल्याने शनिदोषांपासूनही मुक्ती मिळते. 

3) अशोक वनस्पती 

तुळशी विवाहातच्यावेळी अशोक वनस्पती ही भाग्यवान वनस्पती म्हणून मानली जाते. अशोक वनस्पती ही दु:खापासून मुक्ती देणारी वनस्पती मानली जाते.  ही वनस्पती सर्व दुःख दूर करते. तुळशी विवाहाच्या दिवशी हे रोप घरामध्ये लावल्यास ते सर्वात शुभ मानले जाते. घरामध्ये लावल्याने गरिबी दूर होते. हे सर्व तणाव दूर करण्यास मदत करते. मात्र, ही वनस्पती घराच्या आत ठेवू नका, तर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर लावा.

4) कडुलिंबाचे रोप 

तुळशी विवाहात कडुलिंबाला महत्व आहे. कडुलिंबाच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो . त्यामुळे ते घरामध्ये नक्कीच लावावे. तुळशी विवाहाच्या दिवशी योग्य दिशेला कडुलिंबाचे रोप लावल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही. या वनस्पती घरात राहिल्याने नेहमी सुख-समृद्धी राहते. कडुलिंबाचे रोप घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासही मदत करते . घराच्या दक्षिण दिशेला लावणे सर्वात शुभ मानले जाते.

5) मनी प्लांट 

घरासाठी मनी प्लांट खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात मनी प्लांट  लावल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ही वनस्पती जितक्या लवकर घरात वाढेल तितक्या लवकर घरात समृद्धीचे दरवाजे उघडतात, असे सांगितले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT