Elon Musk Astrology esakal
संस्कृती

Elon Musk Astrology : ट्विटरचा बदललेला लोगो इलॉन मस्कचं नशीब बदलणार? ज्योतिषी सांगतात...

ट्वीटरचा मालक इलॉन मस्क याने अचानकपणे ट्वीटरच्या चीमणीला उडवून लोगो बदलला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twitter Logo Changed Astrology : मोठ्या संख्येने कर्मचारी कपात, ब्लू टीक किंवा ट्वीटर संदर्भातले घेतलेले अनेक निर्णय अशा अनेक कारणांनी इलॉन मस्क आणि ट्वीटर चर्चेत असतात. इलॉन मस्कने ट्विटरची सूत्र हातात घेतल्यापासून ट्विटर कंपनी सातत्याने चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ट्विटर चर्चेत आलं आहे. कारण इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल केला आहे.

ट्वीटरची चीमणी ही त्याची खास ओळख होती. पण आता त्यात झालेला हा मोठा बदल इलॉन मस्कसाठी कसा ठरणार याविषयी भाकित करण्यात आलं आहे.

ट्विटरची ओळख असलेला निळा पक्षी (Blue Bird) आता गायब झाला आहे. नव्या बदलानंतर अनेक जण चकित झाले आहेत. ट्विटरने 'डॉज' हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागले. ट्विटर हॅक झालं की काय असंही अनेकांना वाटलं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केलं आहे.

पण इलॉन मस्कने केलेला हा बदल कसा ठरणार आहे? याविषयीचं भविष्य नाशिकचे ज्योतिष्यांनी भाकित केलं आहे. जाणून घेऊया.

"ज्योतिष्यांच्या मते केलेला हा बदल इलॉन मस्कसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे सकारात्मक परिणाम मिळणार आहे. अंकशास्त्र (Numeorology) नुसार इलॉन मस्कला चतुष्पाद ( 4 legs animal ) शुभ / lucky आहेत. त्यामुळे सर्वच बाबतीत या बदलाचे शुभ परिणाम मिळतील."

डॉ .नरेंद्र धारणे, अंकशास्त्र तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT