vastu tips  esakal
संस्कृती

Vastu Tips : सुख-समृद्धी ठेवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर ही धार्मिक चिन्हे लावावीत

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर धार्मिक चिन्हे लावण्याची प्रथा

सकाळ वृत्तसेवा

वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा आहे.त्यामुळे वास्तूमध्ये मुख्य दरवाजाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. विशेषत: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही धार्मिक चिन्हे लावण्याची प्रथा देखील सांगितली गेली आहे, ज्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येते. तुम्ही ही चिन्हे स्वतः बनवू शकता किंवा त्यांचे स्टिकर्सही बाजारात मिळतील.

सुख समृद्धीसाठी चिन्हे:

स्वस्तिक चिन्ह

हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्ह अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्य दरवाजावर लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तर प्रवेश करतेच, बरोबरीने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते. स्वस्तिकमध्ये स म्हणजे 'शुभ' आणि आस्तिक म्हणजे 'असणे'. याचा अर्थ काहीतरी चांगले घडत असते. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर असे कोणतेही चिन्ह लावले तर याचा अर्थ तुमच्या घरात सर्व काही शुभ होईल. एवढेच नाही तर घराबाहेर हे चिन्ह लावल्यास तुमचे घर कोणत्याही वाईट नजरेपासून वाचते. हे मांगल्याचेही प्रतीक आहे. यामुळे तुमच्या घरातल्या सर्व गोष्टी शुभ होतात.

ॐ चिन्ह

ओमचे चिन्ह हे अनहद नादाचे प्रतीक आहे. हा हिंदू परंपरेतील सर्वात पवित्र शब्द आहे. जर तुम्ही ते घराबाहेर लावले तर तुमच्या घरात सुख-शांती येते आणि घरातील सदस्यांचे आजारांपासून संरक्षण होते. हा एक मंत्र देखील आहे आणि नुसता बघितल्यानेही मन शांत होते. घरातला वास्तुदोष दूर होतो. घरात दरिद्री पसरली असेल तर तीही दूर होते. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळद आणि कुंकू लावून हे चिन्ह बनवू शकता.

श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो

सर्व देवतांमध्ये सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते. कारण त्यांना सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि गणेशजींना सर्वात बुद्धिमान देखील मानले जाते. गणेशजी घरात रिद्धी आणि सिद्धी आणतात, म्हणून त्यांना घराच्या मंदिरात प्रथम स्थान दिले गेले आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशजींचे प्रतिमा लावली तरीही ते खूप शुभ आहे.

शुभ लाभाचे चिन्ह

घराच्या मुख्य दरवाज्यापाशी उजव्या आणि डाव्या बाजूला शुभ आणि लाभ लिहावे. सहसा ही दोन चिन्हे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा सणावारी लावली जातात. वर्षभर जुन्या शुभ आणि लाभाच्या जागी तुम्ही नवीन शुभ आणि लाभ चिन्ह देखील लावू शकता.

वास्तविक शुभ आणि लाभ ही श्री गणेशाच्या मुलांची नावे आहेत. जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे चिन्ह लावले तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शुभ राहतो आणि तुम्हाला दररोज लाभ मिळतात. हे चिन्ह तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच नाही तर घराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT