Vastu Tips
Vastu Tips 
संस्कृती

Vastu Tips: झोपतांना ह्या दिशेला पाय करून झोपू नका; ठरू शकते घातक; जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

वास्तू शास्त्रानुसार दक्षिण आणि पूर्व दिशेकडे पाय करून झोपणे चांगले नाही; त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. दक्षिण दिशा ही यमाची आणि पूर्व दिशेवर सूर्याच्या ऊर्जेचा प्रभाव असतो. त्यामुळे ह्या दिशेला पाय करून कधी झोपू नये.

वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वास्तूशास्त्रामध्ये घरातील वस्तू योग्य दिशेने ठेवण्यासोबतच खाण्याच्या आणि झोपण्याच्या दिशाही सांगण्यात आल्या आहेत. वास्तूशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपते तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक समस्या येतात. आर्थिक चणचण आणि करिअरच्या क्षेत्रातील अपयशही त्याला घेरतात. त्यामुळे ठराविक दिशांना पाय ठेवून झोपू नका असा सल्ला दिला जातो.

कोणत्या दिशेला पाय करून झोपावे?

1. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपणे टाळावे. ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेला पाय करून झोपल्याने मृत्यू आणि रोग होतात. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणे अत्यंत अशुभ मानले जाते.

2. सूर्याच्या ऊर्जेचा प्रभाव पूर्व दिशेला जास्त असतो. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सूर्यदेवाची करुणा हवी असेल तर या दिशेला पाय करून झोपण्याची चूक करू नका. पूर्वेला पाय आणि पश्चिमेला डोके ठेवून झोपणे टाळा.

3. जे लोक दक्षिण किंवा पूर्व दिशेला पाय करून झोपतात त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात. भयानक स्वप्ने, भीती, अपयश आणि निराशा त्यांना कधीही सोडत नाही. त्यामुळे शक्य असल्यास या दिशेला पाय करून झोपू नका.

तुम्ही कोणत्या दिशेला पाय करून झोपता?

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाय करून झोपणे खूप चांगले असते. उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. त्याचबरोबर पश्चिम दिशेला पाय करून झोपल्याने ज्ञान मिळते. असे लोक अभ्यासात चांगले असतात. स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करण्यातही ते अत्यंत निष्णात मानले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मराठा आंदोलनामुळे दरदिवशी मोदींची सभा’

आपण सगळे भारतीय आहोत!

लस, गैरसमज आणि आव्हान!

Neeraj Chopra : अवघे 2 सेंटीमीटर... नीरज टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला

जगणं शिकवणारा बापमाणूस!

SCROLL FOR NEXT