Diwali Gift  Sakal
संस्कृती

Vastu Tips For Gifts : 'या' भेटवस्तुंमुळे घरात येते दारिद्र्य; चुकूनही करू नका स्वीकार

दिवाळी काळात अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देत असतात.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips For Gifts : सर्वांना आनंदी आणि सुखी जीवन जगायचं आहे. त्यात येत्या काही काळात दिवाळीचा उत्सव आहे. याकाळात अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देत असतात. काही भेटवस्तू आपल्यासाठी खूप शुभ मानल्या जातात. मात्र, काही भेटवस्तू शुभ मानल्या जात नाही. या भेटवस्तूंमुळे घरात गरिबी येण्यासोबतच नकारात्मक ऊर्जा वाढते. आज आपण अशाच भेटवस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घेणं टाळलं पाहिजे.

वास्तुशास्त्रानुसार सिंह, वाघ, चित्ता इत्यादी प्राण्यांचे चित्र किंवा मूर्ती देणे आणि घेणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे घरातील लोकांमध्ये कलह निर्माण होतो. घरातील सुख-समृद्धी आणि शांती नष्ट होऊ शकते.

मावळत्या सूर्याचे चित्र

वास्तुशास्त्रानुसार, जर कोणी तुम्हाला मावळत्या सूर्याचे चित्र भेट म्हणून देत असेल तर, ते स्वीकारू नये. कारण यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

चाकू, सुरींसारख्या धारदार वस्तू

वरील वस्तूंशिवाय वास्तुशास्त्रानुसार चाकू, कात्री या सारख्या भेट वस्तू स्वीकारल्याने घरातील सदस्यांमध्ये वादाचे प्रसंग वाढू शकतात. तसेच आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे धारदार वस्तू भेटवस्तू म्हणून स्वीकारणे टाळा.

घड्याळे, रुमाल आणि चामड्याच्या वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, जर कोणी तुम्हाला घड्याळ, रुमाल, बेल्ट, पर्स किंवा चामड्याच्या वस्तू भेट दिल्या तर ते न घेण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मत्सराची भावना निर्माण होते. घरात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा भेटवस्तू स्वीकारणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT