Vastu Tips For Kitchen Sakal
संस्कृती

Vastu Tips: स्वयंपाकघरात शेगडी कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Vastu Tips: वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराशी संबंधित अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टींचे पालन केल्यास नकारात्मकता दूर होते.

Puja Bonkile

Vastu Tips: वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगितलेले आहे. वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याची निश्चित दिशा सांगितली आहे. वास्तूनुसार स्वयंपाकघरात काही दोष असेल तर त्याचा परिणाम फक्त स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर होतो.

स्वयंपाकघरातील शेगडी चुकीच्या दिशेला असेल तर घरातील सुख-शांती भंग होते. वास्तूनुसार स्वयंपाकघरात शेगडीच्या दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जाणून घ्या किचनमध्ये शेगडी कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावी हे जाणून घेऊया.

शेगडी या दिशेला ठेवणे टाळा

शेगडी कधीही उत्तर दिशेला ठेवू नका. ही दिशा माता लक्ष्मीचे प्रतिक मानले आहे. स्टोव्ह या दिशेला ठेवल्याने धनाची हानी होते असे मानले जाते.

पश्चिम दिशा ही पितृदेवतांचे प्रतीक आहे. वास्तूनुसार या दिशेला शेगडी ठेवल्याने कुटुंबात आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.

दक्षिण-पश्चिम दिशा राहू ग्रहाचे प्रतीक आहे. या दिशेला स्टोव्ह ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो. यामुळे मानसिक अस्वस्थता आणि समस्या निर्माण होऊ शकतात.

ईशान कोन म्हणजेच ईशान्य दिशेचा कोपरा हे देवाचे प्रतीक आहे. शेगडी या दिशेला ठेवल्याने पूजेत बाधा येते आणि घरात अशांतता निर्माण होते.

शेगडी कोणत्या दिशेला ठेवावी

आग्नेय कोन म्हणजेच आग्नेय दिशा ही अग्निदेवतेचे प्रतिक आहे. वास्तुनुसार या दिशेला स्टोव्ह ठेवणे शुभ मानले जाते, यामुळे घरात सुख-समृद्धी लाभते.

तसेच शेगडी पुर्वेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते. ही दिशा सुर्यदेवाचे प्रतिक आहे. या दिशेला शेगडी ठेवल्याने घरात सकारात्मक उर्जा वाढते. तसेच ग्रहांची स्थिती मजबूत होते. यामुळे कुटूंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT