vastu tips esakal
संस्कृती

Vastu Tips : चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका या वस्तू; सुख-शांती होईल भंग

ज्या घरात सुख, शांती आणि आनंद असतो त्याच घरात माता लक्ष्मीचाही वास असतो

सकाळ वृत्तसेवा

ज्या घरात सुख, शांती आणि आनंद असतो त्याच घरात माता लक्ष्मीचाही वास असतो.अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपल्या घरातील वातावरण आनंददायी ठेवायचे असते, परंतु जर काही कारणाने तुमच्या घराचे वातावरण बिघडत असेल तर त्याचे एक कारण हे स्वयंपाकघर देखील असू शकते. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरातील वातावरण बिघडवण्यास कारणीभुत असतात. त्यामुळे आत्ताच या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातून बाहेर काढा. जाणून घेऊया काय आहेत या वस्तू

शिळे पीठ

बरेचदा लोक उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर वापरतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे केवळ आरोग्यासाठीच हानिकारक नाही तर शनि आणि राहूवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

किचनमध्ये औषधे ठेवू नका

अनेकजण किचनमध्ये औषधे ठेवतात जे चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार औषधं कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. असे केल्याने आजार वाढण्याची शक्यता असते ,तब्येत बिघडल्यामुळे उपचारात बराच पैसा खर्च होतो. त्यामुळे आर्थिक समस्यांनाही सामोरे जावं लागू शकतं.

स्वयंपाकघरात मंदिर

काही घरांमध्ये स्वयंपाकघरात मंदिर बांधलेले दिसते. स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णाचे स्थान आहे आणि अग्नी देवताही येथे वास करते अशी लोकांची श्रद्धा आहे. पण वास्तूनुसार स्वयंपाकघरात कधीही मंदिर बनवू नये. कारण स्वयंपाकघरात सात्विक आणि तामसिक दोन्ही अन्न शिजवले जाते. कांदा आणि लसूण यांचाही आहारात समावेश होतो. स्वयंपाकघरात मंदिर असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

घरामध्ये तुटलेली व तडे गेलेली भांडी ठेवू नयेत

बर्‍याच वेळा काम करताना भांड्याला तडे जातात आणि असे असतानाही तुम्ही ते वापरता. पण आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तूनुसार तुटलेली आणि तडे गेलेली भांडी ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घराच्या डोक्यावर कर्ज होते. यासोबतच परस्पर मतभेदही वाढतात.

स्वयंपाकघरात चप्पल घालू नका

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात चप्पल घातल्याने घरात नकारात्मक प्रभाव पडतो.घाण आणि जंतू स्वयंपाकघरात पोहोचतात. एवढेच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात राहते त्यामुळे चप्पल घालून तिचा अपमान करु नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT