Vastu Tips टाळा नकारात्मकता Esakal
संस्कृती

Vastu Tips तुळशीच्या बाजूला कधीही ठेवू नका ही रोपं, घरात वाढेल नकारात्मकता

तुम्हाला माहित आहे का की वास्तूशास्त्रानुसार तुळशीच्या शेजारी किंवा तुळशीजवळ काही रोपं ठेवणं चुकीचं मानलं जातं. तुळशीच्या जवळ कोणती रोपं किंवा झाड नसावं हे पाहूयात

Kirti Wadkar

भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मामध्ये तुळशीला महत्वांचं स्थान आहे. हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. कोणतीही पूजा विधी असो तुळशीचं स्थान महत्वाचं असतं. तुळशीला जीवन देवी असं म्हटलं जातं.

केवळ पूजाविधी किंवा धार्मिक कार्यचं नव्हे तर आरोग्य, अध्यात्म आणि वास्तू शास्त्रातही तुळशीला महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. हिंदू शास्त्रानुसार तुळशीमध्ये Tulsi माता लक्ष्मी वास करते. यासाठी तुळशीला पवित्र मानलं जातं. Vastu Tips in Marathi Know what plants should not accompany Tulsi plant at your home

धार्मिक ग्रंथांमधील उल्लेखांनुसार भगवान विष्णूंना Lord Vishnu देखील तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीचं नित्यनेमाने पूजन केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करतात.

घराच्या मुख्यदारासमोर तुळस लावण्याची हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे. घरामध्ये किंवा घरासमोर तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसंच घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की वास्तूशास्त्रानुसार तुळशीच्या शेजारी किंवा तुळशीजवळ काही रोपं ठेवणं चुकीचं मानलं जातं. तुळशीच्या जवळ कोणती रोपं किंवा झाड नसावं हे पाहूयात

वडाचं झाड- हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाची देखील पूजा केली जाते. मात्र असं असंल तरी वास्तूशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही वडाचं झाड नसावं. यामुळे घरामध्ये वाद विवाद निर्माण होवू शकतात. तसचं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

पिंपळ- हिंदू धर्मामध्ये तुळस आणि पिंपळ दोन्हीही पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. असं असलं तरी तुळशीच्या रोपाजवळ पिंपळाचं झाड असणं अशुभ मानलं जातं. कारण तुळशीच्या रोपामुळे घरामध्ये सुख-समृद्धी नांदते तर पिंपळाचं रोप घरातील धनहानी किंवा आर्थिक नुकसानासाठी कारणीभूत ठरु शकतं.

हे देखिल वाचा -

रुईचं झाड- मारुतीरायाला रुईच्या पानांचा हार अर्पण केला जातो. म्हणजेच हिंदू धर्मामध्ये रुई देखील पवित्र आहे. मात्र असं असलं तरी घरासमोर तुळशीजवळ रुईचं रोप असू नये. तुळशीजवळ रुईचं रोप असल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि अडचणी वाढतात.

शमीचं झाड- वास्तूशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ शमीचं झाडं नसावं. तुळशीसमोर शमीचं झाड असल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं.

काटेरी रोपं- अलिकडे अनेकजण घरामध्ये किंवा घराबाहेरही काही शोभेचे विविध प्रकारची निवडुंगाचे प्रकार लावतात. मात्र तुळशीच्या रोपाजवळ अशी काटेरी रोपं ठेवू नयेत. काटेरी रोपं ही राहुची कारक मानली जातात. यामुळे नकारात्मकता वाढू लागते. तसचं यामुळे कुटुंबातील लोकांच्या कामात अडचणी निर्माण होवून प्रगती थांबते.

या रोपांसोबतच तुळशीच्या जवळ कडूलिंबाचं झाडं तसंच इतर जंगली रोपं उगवणार नाही याची काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Raksha Andolan: राम मंदिर देणगीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार! महाराष्ट्रातून 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा; कुठून सुरूवात होणार?

Mumbai News: तापामुळे रुग्णालयात दाखल; सकाळी ठाकरे गटाच्या ३२ वर्षीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू, तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं

Latest Marathi News Live Update : गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे उघडले; वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Fact Check: वैभव सूर्यवंशीने Laila Faisal ची रिल केली रिपोस्ट; अभिषेक शर्माच्या कथित गर्लफ्रेंडला फॉलो करतोय पठ्ठ्या

Khambatki Ghat Landslide : पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ दरड कोसळली; काही काळ वाहतूक विस्कळीत, सहाव्या वळणावर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT