Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : रोज दारापुढे रांगोळी काढल्याने कधीच होत नाही लक्ष्मी देवीचा कोप

ता फक्त सण, शुभ प्रसंग आणि लग्नात वगैरे रांगोळी काढली जाते

सकाळ वृत्तसेवा

आपण लहानपणी आपल्या आईला आणि आजीला सकाळी लवकर उठून सडा घालून दारापुढे तुळशीपुढे रांगोळी काढताना बघितल असेल ना? पण आताच्या धावपळीच्या जगात आपल्या कामातून यासाठी वेळ काढणे खूप कठीण होते.

आता फक्त सण, शुभ प्रसंग आणि लग्नात वगैरे रांगोळी काढली जाते; बाकी इतर वेळी कोणीही आपल्या दारापुढे रांगोळी काढत नाही. फ्लॅट सिस्टीममुळे दारापुढे तेव्हढी जागाही तिथे नसते. त्यामुळे रांगोळी काढणं शक्य होत नाही. पण रोज सकाळी बाहेरचं अंगण झाडून रांगोळी काढली तर घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो; घरात सकारात्मक शक्ती वाढते.

दारात रांगोळी काढण्याचे फायदे:

१. घरात शांततेचं आणि समाधानाच वातावरण राहत

रांगोळी ही खूप शुभ मानली जाते, दारापुढे रांगोळी काढली की घरात येणारे ऊर्जेचे दूत घरात समाधान आणि शांतता घेऊन येतात, शिवाय तिने फार प्रसन्नही वाटते.

२. बाहेरून येणाऱ्यांचे वाईट विचार बाहेरच राहतात.

असं म्हणणं आहे की रांगोळी काढल्याने बाहेरची व्यक्ती जी घरात येणार आहे तिच्या मनातले वाईट विचार बाहेरचं राहतात आणि ती चांगल्या मनाने घरात येतात.

३. लक्ष्मी देवी होते प्रसन्न

लक्ष्मी देवीला घाण कचरा अजिबात आवडत नाही; जे घर स्वच्छ असते तिथे लक्ष्मी देवी नेहमी वास करते; दारापुढे रांगोळी काढून एका पद्धतीने आपण तिला निमंत्रित करतो आणि त्यामुळे ती प्रसन्न होते.

४. थकवा दूर होतो

तुम्ही कितीही थकून भागून घरी या; आल्यावरती दारात रंगबेरंगी रांगोळी बघून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही; त्या रांगोळीमुळे तुमचे मन क्षणार्धात प्रसन्न होईल आणि थकवाही दूर होईल.

त्यामुळे रोज दारापुढे छोटीशी का होईना पण रांगोळी काढावी, हल्ली बाजारात मिळणारे छापही तुम्ही काढू शकतात किंवा उंबऱ्यावरती स्वतीक, गोपद्म, लक्ष्मी पद्म देखील काढू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: वाशिममध्ये वीटभट्टी जवळील विहरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT