Vastu Tips esakal
संस्कृती

Vastu Tips : नैवेद्य संबंधित करू नका या चुका, येईल गरीबी

सकाळ वृत्तसेवा

आपल्या भारतीय संस्कृतीत होम-हवन केल्यानंतर, पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते. अशाने देव आणखीन प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर सुख समृद्धीचा वर्षाव करतात आणि आपली कृपा त्यांच्यावर ठेवतात असं मानलं जातं.

वास्तुशास्त्राविषयी सांगायचे तर त्यात देवाला नैवेद्य दाखवण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमांकडे दुर्लक्ष केले तर घरात अडचणी येतात. देवाला देयच्या नैवेद्या संबंधित काय नियम आहेत ते जाणून घ्या.

नैवेद्याबद्दल मनामध्ये संभ्रम आहे?

वास्तुशास्त्रात देवाला अर्पण केलेल्या अन्नाला नैवेद्य म्हणतात. हा नैवेद्य अत्यंत शुभ मानला जातो. देवाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवल्या नंतर त्या प्रसादाचे काय करायचे, आपण काही शकतो का की मूर्ती जवळ ठेवून देयचा? हा प्रश्न संभ्रमात असतो.

खर तर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर काही वेळाने तो तिथून उचलून घ्यावा. कारण अस म्हणतात की चंदनशु, चांडाली, शुकसेन आणि चंडेश्वर नावाच्या चार नकारात्मक शक्ती तेव्हा तिथे असतात ज्या नैवेद्य फार वेळ तिथेच ठेवला असेल तर तिथे येऊन तो नैवेद्य उष्टा करतात, यामुळे माणसाच्या आयुष्यात दुःख सुरू होते.

वास्तुशास्त्रानुसार नैवेद्य देवाच्या मूर्तीसमोरून काढून तांबे, चांदी, सोने, दगड, माती किंवा लाकडी भांड्यात ठेवावेत. हे करणे खूप शुभ मानले जाते आणि देवाचा आशीर्वाद कुटुंबाला मिळतो.

देवाचा नैवेद्य आपल्या माणसात वाटून खा.

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की त्या भांड्यात ठेवलेल्या नैवेद्याचे काही वेळाने प्रसादात रूपांतर होते. हा प्रसाद आपण स्वतः खावा आणि शक्य असेल तर आपल्या जवळच्या माणसांना देखील खायला द्यावा.

अशाने देव प्रसन्न होतो आणि सगळ्यांना आशीर्वाद देतो. असे म्हटले जाते की जे लोक प्रसादाशी संबंधित हा नियम भक्तीभावाने पाळतात, त्यांना आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT