Vastu Tips: oil or ghee deepak  esakal
संस्कृती

Vastu Tips: तेल किंवा तुपाचा दिवा बदलू शकतो तुमचं नशीब, फक्त या गोष्टींची घ्या काळजी

जाणून घेऊया तेल किंवा तुपाचा दिवा तुमच्यासाठी कसा शुभ ठरू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips: घरी देवाजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. वेद शास्त्रात देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. घरी दिवा लावण्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं. घरात सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरातील वास्तु दोष समाप्त होतात. सरसो, तीळ, चमेलीच्या तेलाचा दिवा काही विशेष मुहूर्तावर लावला जातो. चला तर जाणून घेऊया तेल किंवा तुपाचा दिवा तुमच्यासाठी कसा शुभ ठरू शकतो.

दिवा लावल्याने दूर होते नकारात्मक उर्जा

वास्तु शास्त्रानुसार घरी दिवा लावल्याने घर नेहमी सकारात्मक उर्जेने सक्रिय असतं. याबरोबरच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. शास्त्रानुसार देवी देवतेला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो. त्यामुळे पूजा करताना दिवा जाळणं शुभ मानल्या जातं.

या दिशेला ठेवावा दिवा

मानलं जातं की देवघरात तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताच्या दिशेत ठेवावा. तर तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताच्या दिशेला ठेवावा. आणि दिवा मध्येच विझू नये याची विशेष काळजी घ्यावी.

तेल आणि तुपाच्या दिव्यात फरक काय ?

मान्यतेनुसार तुपाचा दिवा हा देवी देवतेला समर्पित आहे. तर तेलाचा दिवा कोणाच्या ईच्छापूर्तीसाठी किंवा दोष दूर करण्यास लावला जातो.

वाचा कधी आणि कोणत्या तेलाचा दिवा कधी उपयोगी

जर देवीला प्रसन्न करायचं असेल तर तुपाचा दिवा जाळा. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते.

शनि दोष, साडे साती पासून मुक्तता मिळवण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळणं शुभ मानलं जातं.

हनुमानाला प्रसन्न करायचं असेल तर चमेलीच्या तेलाचा दिवा जाळला जातो. आणि तीन वातीचा दिवा जाळावा.

सूर्यदेव किंवा कालभैरवला प्रसन्न करण्यासाठी सरसोच्या तेलाचा दिवा जाळावा.

तुमच्या कुंडलीमध्ये राहु किंवा केतुला शांत करण्यासाठी तेलाचा दिवा जाळणं शुभ असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT