vastu tips esakal
संस्कृती

Vastu Tips : या दिवशी घरात लावा तुळशीचे रोप; बदलेल नशिब

गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ

सकाळ वृत्तसेवा

वास्तूशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते,त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो. कोणत्या दिवशी तुम्ही घरी तुळशीचे रोप लावावे आणि त्याचे कोणते नियम आहेत हे जाणून घेऊयात.

या दिवशी घरामध्ये तुळशीचे रोप लावावे

हिंदू धर्म आणि वास्तूशास्त्रानुसार गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते.गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे आणि तुळशीची विष्णू प्रिय म्हणून पूजा केली जाते.त्यामुळे गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर कायम राहते. जर आपण वर्षातील महिन्यांबद्दल बोललो तर हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिना हा तुळस लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. या महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा करून त्यासमोर दिवा लावला जातो.

या दिवशी तुळशीला हात लावू नये

वास्तूशास्त्रामध्ये रविवारी तुळशीच्या रोपाला हात लावू नये. रविवार आणि एकादशी या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जली व्रत करते.

रामा किंवा श्यामामध्ये कोणती तुळशी शुभ आहे

ज्या तुळशीची पाने हिरवी असतात तिला रामा तुळशी म्हणतात आणि ज्याच्या पानांचा रंग गडद असतो त्याला श्यामा तुळशी म्हणतात. श्रीकृष्ण किंवा राधा राणीच्या भक्तांसाठी श्यामा तुळशीला पवित्र मानले जाते.या दोन्ही प्रकारची तुळशी घरासाठी शुभ असते, परंतु घराच्या अंगणात एकच तुळस लावावी.

घरामध्ये तुळशीची पूजा कशी करावी

तुळशीच्या रोपाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील बिंदू मानलं जातं. तुळशीच्या रोपाची पूजा नियमित करावी आणि तुळशीजवळ दिवाही ठेवावा. तुळशीला नियमित जल अर्पण करणार्‍याला मोक्ष प्राप्त होतो,असे मानले जाते.

तुळशीचे रोप सुकत असल्यास काय करावे

तुळशीच्या रोपामध्ये वाळलेली मंजुळा असल्यास ती काढून टाकावी, कारण त्यामुळे तुळशीचे रोप लवकर खराब होऊ शकते. ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते त्याची मातीही पवित्र मानली जाते.तुळशीच्या झाडाच्या फांद्या विनाकारण कापू नयेत. जर हे रोप सुकले तर योग्य धार्मिक विधी करून वाळलेल्या रोपाला नदीत फेकून द्या. वाळलेल्या तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये.येथे सांगितलेल्या नियमांनुसार जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले तर ते तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल आणि तुमच्या घरातील सुख-समृद्धी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT