Vastu Tips Esakal
संस्कृती

Vastu Tips: झाडू कधी विकत घ्यावा; घराच्या सुख-समृद्धीसाठी पाळा हे नियम

झाडूला लक्ष्मी मातेचं रूप मानलं गेलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात असते. साफसफाई करण्यासाठी नवनव्या वस्तू आल्या तरी आजही झाडू वापरला जातो. झाडूला माता लक्ष्मीचे  रूप मानले जाते. घर झाडल्यामुळे घरातली घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती घरात येते. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचं रूप मानलं गेलं आहे.

चालताना अचानक एखाद्याचा पाय झाडूला लागला तर मोठे लोक सांगतात की झाडूला नमस्कार करा. ते तस का सांगतात?, झाडूची पुजाही करतात. पण का? हे असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील ना. त्यामागील कारणे आज जाणून घेऊयात. 

नवीन झाडू कधी विकत घ्यावा?

तुम्ही नवे घर घेतले असेल आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचे असेल तर तुम्हाला नवीन झाडू घ्यावा लागतो. जूना झाडू खराब झाल्यास नवीन झाडूची खरेदी करताना नेहमी शनिवारीच करावी. कारण शनिवारी घरात नवीन झाडू आणणे शुभ मानले जाते. 

आता बघू या झाडूविषयी काही धार्मिक नियम

1) उभा झाडू ठेवणे अशुभ असते. त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. झाडू कधीही उभा ठेवू नका. तो नेहमी जमीनीवर आडवा ठेवावा.

2) कधीही तुटलेला झाडू वापरू नये. झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा. 

3) गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नये.

4) वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये. कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते.

5) झाडू कधीही कपाटाच्या मागे, शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये. यामुळे आर्थिक चणचण भासू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT