पॉझिटीव्ह एनर्जी sakal
संस्कृती

Vastu Tips : घर सुगंधित ठेवल्याने मिळणार सुख,शांती ; असे ठेवा घराला स्वच्छ आणि सुगंधित

अगरबत्ती हे शुभ संकेताचे प्रतीक असल्याचे पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काहीवेळा एखाद्या घरात गेल्यावर येणारा प्राण्यांचा, ओल्या कपड्यांचा वास नको वाटतो. कधी एकदा त्या घरातून बाहेर पडतोय असे वाटते. त्यावेळी त्या घरावर केवळ पाहुणेच नाही तर वास्तूपुरूष देखील नाराज होतो. तेच उलट घर सुगंधित ठेवल्याने वातावरणात पॉझिटीव्ह एनर्जी आणि ताजेपणा राहतो. यामुळे घरात सुख-समृद्धी येण्यासोबत

पॉझिटीव्हनेस वाढतो.

घराला सुगंधित ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. काही लोक रूम फ्रेशनर मारतात ज्याचा सुगंध काही वेळ घराला फ्रेश ठेवतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा काही नॅचरल गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या घराला सुगंधी आणि फ्रेश बनवण्यात मदत करतात.

अगरबत्ती

अगरबत्ती हे शुभ संकेताचे प्रतीक असल्याचे पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात. अगरबत्ती केवळ देवाजवळ लावली जाते. त्यामुळे देवघरात अगरबत्तीचा सुवास पसरतो. यासाठी सकाळ संध्याकाळ संपूर्ण घरात चांगल्या सुगंधी अगरबत्ती लावा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते आणि घरातील वातावरण चांगले राहते. तुम्ही घरात उदीचा धूर करू शकता. त्याच्या धुराने घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात. यामुळे घरात देवतांचा वास राहतो.

ताजी फुले

घरातील नैसर्गिकरीत्या फ्रेशनेस रहावा यासाठी वासाच्या फुल झाडांचा वापर करता येतो. तसेच, एका खोटगट काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून ते हॉलमधील एका कोपऱ्यात ठेऊ शकता. यामुळे घरात चांगला सुगंध तर राहीलच. पण येणारे पाहुणे आणि घराचील व्यक्तींनाही पॉझिटीव्ह वाटेल.

घर नेहमी चांगल्या सुवासाने दरवळत रहावे यासाठी, चंदनाचा वापर करावा. हे करणे शुभ मानले जात असून चंदनाच्या वापराने घरात पॉझिटीव्ह एनर्जी येते. चंदनाचा सुगंध मनाला शांती देतो. तर, कापूर आणि लवंगाच्या वापरानेही घर सुगंधी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

Social Media Impact : सोशल मीडियावर अर्ध-नग्नता; समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम काय असू शकतो?

Ajit Pawar: ''ज्यांनी हे पाप केलं असेल त्यांच्या घरात...'', अमोल मिटकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT