Vastu Tips For coconut tree Sakal
संस्कृती

Vastu Tips: 'या' दिशेला लावू नका नारळाचे झाड, वाढू शकतो कौटुबिंक त्रास

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार नारळाचे झाड कोणत्या दिशेलाला लावणे शुभ मानले जाते.

Puja Bonkile

Vastu Tips: अनेक लोक घरामध्ये झाडे आणि रोपे लावतात. वास्तुशास्त्रात देखील झाडे लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात झाडे किंवा रोपे लावल्याने सकारात्मकता कायम राहते. झाडे किंवा रोपे लावताना वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा घरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रात अशी अनेक झाडे सांगितली आहेत, जी घराच्या अंगणात लावणे फायदेशीर मानले गेले आहेत. यातील एक नारळाचे झाड आहे. घरामध्ये नारळाचे झाड लावताना योग्य दिशा कोणती असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण चुकीच्या दिशेने नारळाचे झाड लावल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या ठिकाणी लावू नका

या देवतांचा वास

वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. याशिवाय नारळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, भगवान शिव आणि ब्रह्मा वास करतात असे मानले जाते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. याशिवाय नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

पुर्व किंवा उत्तर

अशा स्थितीत घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला नारळाचे झाड कधीही लावू नका असे वास्तुशास्त्र सांगते. अनेक झाडे या दोन दिशांना लावणे चांगले मानले जात असले तरी या दिशेला नारळाची झाडे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

उत्तर दिशा

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला नारळाचे झाड लावल्याने धनाची हानी होते आणि घरात समस्या निर्माण होतात. त्याच वेळी पूर्व दिशेला ठेवल्यास, आदर कमी होऊ लागतो आणि घरामध्ये कौटुंबिक कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकतात. तसेच घरातील शांतता भंग पावू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT