Vastu Tips Esakal
संस्कृती

Vastu Tips: घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? काय सांगितलंय वास्तुशास्त्रात जाणून घ्या...

नवीन वर्ष सुरु होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Shastra: नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष सुरु होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते. खरंतर, वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत. असे मानले जाते की, कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते. चला तर मग आज लेखात आपण जाणून घेऊया वास्तुनुसार घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे याविषयीची माहिती...

वास्तुशास्त्रात घरातील जुने कॅलेंडर हटविण्याविषयी काय सल्ला दिला जातो?

सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर हटविणे अत्यावश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही, असे सांगितले जाते. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टीं घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये. त्यामुळे वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे, असा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो.

अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्याठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून देतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? ते योग्य दिशेला लावले आहे का? वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत. त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील भिंतीला लावू शकतो. 

वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तुनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते असे मानले जाते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य देवाची दिशा देखील पूर्व आहे. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT