Vastu Tips sakal
संस्कृती

Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी महिलांनी या गोष्टी नक्की कराव्यात, सुख-समृद्धी वाढून भरभराट होईल

घरातील महिलांनी केलेल्या कामामुळे सुख-समृद्धी येते कारण हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.

Aishwarya Musale

घरातील स्त्रीला हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचे अवतार मानले जाते. त्यामुळे असे मानले जाते की ज्या घरात स्त्री प्रसन्न असते, तिथे देवी लक्ष्मी निवास करते आणि तिच्यावर कृपावर्षाव होतो. तसेच ज्या घरात स्त्रिया दु:खी राहतात त्या घरात दु:खाचा ढीग असतो.

कुटुंबावरही स्त्रीने केलेल्या कामाचा परिणाम होतो. महत्वाचे म्हणजे अशा काही उपायांबद्दल ज्योतिष आणि वास्तुशास्त्राने सांगितले आहे ज्यामुळे घरातील सर्व समस्या दूर होतात, गरिबी नष्ट होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते. स्त्रीने झोपण्यापूर्वी हे उपाय करावेत, तरच फायदा होईल. चला तर जाणून घेऊया या उपायांबद्दल.

महिलांनी झोपण्यापूर्वी हे करावे

  • रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवावा. हे उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो.

  • तसेच कौटुंबिक मतभेद देखील संपतात. कापूर जाळल्याने पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यात गोडवा येतो.

  • स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. स्त्रीने हा उपाय केल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते.

  • घरातील देवघरात स्त्रीने झोपण्यापूर्वी अगरबत्ती लावावी.

  • रात्री झोपण्यापूर्वी हात पाय चांगले धुवा, कमीतकमी 5 मिनिटे आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा.

  • लोक सहसा झोपण्यापूर्वी घरातील सर्व दिवे बंद करतात. लक्षात ठेवा की घराचा नैऋत्य कोपऱ्यात अंधार नसावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT