Vat Purnima 2023 esakal
संस्कृती

Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला भाद्र सावट, पतीच्या दीर्घायुष्यासाठी कधी अन् कशी पूजा करावी इथे वाचा

यावर्षी वट पौर्णिमा व्रत 3 जून 2023 रोजी म्हणजे आज साजरे केले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vat Purnima 2023 : वट सावित्री व्रताप्रमाणे वट पौर्णिमा व्रत देखील पाळले जाते. पण वट सावित्री व्रत उत्तर भारतात पाळले जाते, तर वट पौर्णिमा व्रत प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात पाळले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. यावर्षी वट पौर्णिमा व्रत 3 जून 2023 रोजी म्हणजे आज साजरे केले जाणार आहे.

वट पौर्णिमा व्रता तिथी

हिंदू कॅलेंडरनुसार, वट पौर्णिमा व्रत जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला पाळली जाते. यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 3 जून रोजी सकाळी 11:16 वाजता सुरू होईल आणि 4 जून रविवारी सकाळी 09:11 पर्यंत चालेल. या कारणामुळे ज्येष्ठ पौर्णिमा व्रत आणि वट पौर्णिमा व्रत 3 जून रोजी पाळले जाईल परंतु पौर्णिमा स्नान 4 जून रोजी सकाळी केले जाईल. (Muhurta)

वट पौर्णिमा व्रताचा मुहूर्त

यावेळी वट पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी भाद्रची सावली राहील. भाद्र वटपौर्णिमेला सकाळी 11.16 ते रात्री 10:17 पर्यंत राहील. ही भाद्र स्वर्गात असल्याने याचा दुष्परिणाम पृथ्वीतलावर होणार नाही. भाद्र काळात शुभ कार्य करण्यास मनाई असते. 3 जून रोजी वट पौर्णिमा व्रताच्या पूजेसाठी सकाळ आणि दुपारचे शुभ मुहूर्त आहेत. वट पौर्णिमा पूजेचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 07:07 ते 08:51 पर्यंत असेल, हा वट पौर्णिमा पूजेसाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम मुहूर्त आहे. तर पूजेचा दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 12.19 ते 05.31 पर्यंत आहे.

वट पौर्णिमेला 3 अतिशय शुभ योग बनत आहेत

2023 मध्ये वट पौर्णिमा व्रताच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. हे शुभ योग म्हणजे शिव योग, सिद्ध योग आणि रवि योग. रवियोग सकाळी 05:23 ते 06:16 पर्यंत, शिवयोग सकाळी 02:48 ते 02:48 पर्यंत आणि सिद्ध योग दुपारी 02:48 ते रात्री उशिरापर्यंत असेल. हे योग पूजा आणि शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT