Married women doing worships & pooja on vat savitri purnima esakal
संस्कृती

Vat Purnima 2023 : पौर्णिमा नक्की कधी? ३ जून की ४ जून? जाणून घ्य़ा मुहुर्त व महत्त्वाच्या वेळा

वट पौर्णिमा केव्हा आहे, कोणत्या वेळी या दिवशी पूजा करणं शुभ राहील आणि पूजेचं महत्त्व जाणून घेऊया.

वैष्णवी कारंजकर

पौर्णिमा आणि अमावस्येला हिंदू धर्मात विशेष दर्जा देण्यात आला आहे. यासोबतच पौर्णिमा ही महिन्याचा शेवटचा दिवस मानली जाते. पौर्णिमेच्या दिवशी स्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी पौर्णिमेचं व्रतही ठेवलं जातं.

या दिवशी व्रत आणि स्नान केल्याने धन, सुख, समृद्धी, यश आणि संतानप्राप्ती होते असं मानलं जातं. या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे इच्छित फळ प्राप्त होते. तसंच या दिवशी चंद्र पूर्ण दिसतो आणि या दिवशी चंद्राला जल अर्पण केल्याने मानसिक तणाव दूर होतो असं सांगितलं जातं.

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणतात. ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा असंही म्हणतात. वट पौर्णिमा केव्हा आहे, कोणत्या वेळी या दिवशी पूजा करणं शुभ राहील आणि पूजेचं महत्त्व जाणून घेऊया.

कधी आहे वटपौर्णिमा?

पौर्णिमा सुरू - ३ जून सकाळी ११ वाजून १६ मिनिटे

पौर्णिमा तिथी समाप्त - ४ जून सकाळी ९ वाजून ११ मिनिटे

पौर्णिमा चंद्रोदयाची वेळ - ३ जून संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटे

त्यामुळे वट पौर्णिमेचे व्रत ३ जून रोजी करावे.

वट पौर्णिमेचे महत्त्व

सौभाग्यासाठी वट सावित्री व्रत पाळण्यात येतं. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सूर्योदयापासून फळाचा उपवास करून किंवा निर्जल उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि प्रदक्षिणा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

SCROLL FOR NEXT