संस्कृती

दीपावली म्हणजेच आरोग्योत्सव

शरीराचे बल वाढवून शरीराची शक्ती वृद्धिंगत करणारा ऋतू म्हणजेच हेमंत- शिशिर ऋतू. या ऋतूंमध्ये शरीरस्थ अग्नी निसर्गतःच वाढतो. त्यामुळे शरीरधातूंचा अग्नीही वाढतो.

वैद्य विक्रांत जाधव

दीपावली जसा दिव्यांचा उत्सव, आनंदाचा उत्सव, तसेच तो खाद्यपदार्थांचाही उत्सव आहे. भारतात तर विविध ठिकाणी विविध प्रकारचे गोड, तिखट पदार्थ करण्याची प्रथा आहे. अगदी घराघरांत साध्या चकलीची निर्माणप्रक्रियासुद्धा वेगळी दिसून येते. हा सण जणू हेमंत ऋतूच्या स्वागतासाठीच रचलेला आहे.

शरीराचे बल वाढवून शरीराची शक्ती वृद्धिंगत करणारा ऋतू म्हणजेच हेमंत- शिशिर ऋतू. या ऋतूंमध्ये शरीरस्थ अग्नी निसर्गतःच वाढतो. त्यामुळे शरीरधातूंचा अग्नीही वाढतो. त्यामुळे पचायला जड स्निग्ध पदार्थही पचून शरीरधातूंचे उत्तम पोषण करतात. या खाद्यपदार्थांत दूध, तूप, साखर, उडीद, गव्हाचे पीठ आदींचा वापर जास्त प्रमाणात केला आहे. प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातूवर्धक, वातनाशक, उष्ण असे पदार्थ आहेत. गोड पदार्थाएवढेच तिखट पदार्थ विविध ग्रंथांत संबोधले गेले असून, काळाप्रमाणे त्याची पुनर्रचना झालेली दिसून येते. दीपावलीच्या पदार्थांत प्रामुख्याने लाडू, करंज्या, घारगे, अपूप (अनारसे), चाणकपुरिका (तिखट पुऱ्या), फेणिकांचे प्रकार शास्त्रीय ग्रंथांत आढळतात.

दीपावली : मनःप्रिय पथ्य

दीपावली हा शब्दच मुळात मनात विविध प्रकारच्या प्रकाशाच्या रंगांनी तेज निर्माण करतो. आसमंतात असणारा गारवा, वाढलेली भूक, बाह्य वातावरणाच्या प्रसन्नतेमुळे काम करण्याचे सामर्थ्य वाढून शरीर व मन मुळातच समाधानी असते. अशा निसर्गात वाढलेल्या भुकेचा फायदा, तसेच पचनशक्ती वाढलेली क्षमता लक्षात घेऊन विविध नवनवीन, चवदार, पचायला जड स्निग्ध पदार्थांचे सेवन करण्याचा आग्रह आयुर्वेदशास्त्रकारांनी केलेला दिसतो. या पदार्थांच्या निर्मितीचे विश्‍लेषणही शास्त्राने केले आहे.

आज हेल्थ कॉन्शियसच्या युगात हे पदार्थ अत्यंत फीट बसतात. विविध प्रकारच्या खिरी असोत, गुलाबजाम, पेढे, बर्फी असोत किंवा आजकाल लोकप्रिय झालेल्या पनीरचा पदार्थ असो, सर्वांचे वर्णन तीन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांत आढळते. अगदी फ्रूटसलाड, डेझर्टचे प्रकारही पुराणकाळापासून प्रचलित आहेत. विविध प्रकारचे रायते वर्णन केले असून, त्यातील घटकद्रव्येही केवळ चव निर्माण करीत नाहीत, तर आरोग्य राखण्यातही यशस्वी ठरतात. त्यातील काही पदार्थांच्या कृती व गुणात्मक विचारांची भेट दिवाळीत मिळाल्यास हेमंतादी ऋतूंमध्ये चवदार, आरोग्यवर्धक, मनाला तृप्त करणारे खाद्यपदार्थ दिवाळी सुखकर करेल यात शंकाच नाही.

हल्ली कोणत्याही भोजनाची सुरवात सूप या पदार्थाने होते. धान्यांचे सूप हे अत्यंत उपयुक्त, चविष्ट व आरोग्यवर्धक असून, भूकही वाढवते; परंतु धान्यांचे सूप घेण्याची प्रथा कमी दिसते. डाळींचे सूप हे थंडीत विशेषतः दिवाळीत फराळ व गोड पदार्थ पचविण्याची क्षमता वाढविणारे व शरीरात निर्माण होणारा वात कमी करणारे आहेत. आयुर्वेदाने मूग, मसूर, उडीद दळून त्यांची डाळ तयार करून त्याचे सूप सांगितले आहे. या सूपनिर्मितीत गूळ, कोकम, चिंच, धणे, जिरे, मोहरी टाकून तुपाची फोडणी देण्यास सांगितले आहे. अशा पद्धतीने निर्माण केलेले सूप हे वातनाशक आणि स्नेह निर्माण करणारे आहे.

आयुर्वेदशास्त्रकारांनी फळभाज्या व डाळींचा वापर थंडीच्या ऋतूमध्ये विशेष वर्णन केलेला दिसतो. त्यातही विविध पाचक, अग्निदीपक पदार्थांचे (म्हणजे काळी मिरी, सुंठ, दालचिनी, दगडफूल आदी) मिश्रण करून पचायला हलके केलेले दिसते. या ठिकाणी दगडफूल या मसाल्याच्या पदार्थाबाबत थोड सांगावेसे वाटते. दगडफूल साथीच्या आजारांत स्वाइन फ्लू, डेंगी यांसारख्या वरील उत्तम प्रतिकारक्षमता वाढविणारे औषध आहे. यापासूनच त्याची औषधे निर्माण होतात. सध्या मसाल्याची अनेक द्रव्ये औषधांमध्ये वापरली जात असून, त्याची उपयुक्तता व शरीरावरील परिणाम लक्षात घेता येतात. केवळ डाळींचे सूप मलावष्टंभ करणारे ठरते, तर भाजलेल्या डाळींचे सूप मलावष्टंभ करत नाही. त्यातही डाळ भाजून त्याची साल काढल्यावर ती पचायला अधिकच हलकी होते. कफवात, खोकला, श्‍वास, तसेच कफवातजन्य व्याधी कमी करणारे ठरते. थंडीच्या दिवसांत बऱ्याच वेळा तेलकट, जड पदार्थ सेवन करून वात व कफ वाढतो. त्यासाठी हे सूप दिवाळीतील खाण्यामध्ये घेतल्यास वेगळेपणा व आरोग्याची अनुभूती मिळते.

सर्वच प्रकारचे सूप हे अग्नी वाढविणारे व पाचक असले, तरी ते अतिप्रमाणात सेवन केल्यास व शिळे खाल्ल्यास पित्त वाढविणारे ठरते. सूप पचायला अत्यंत हलके, भूक वाढविणारे, वात कमी करणारे, शरीराचा थकवा दूर करणारे, तसेच पित्त, उलटी, जुलाब यांच्या व्याधींत विशेष उपयुक्त आहे. दिवाळीसाठी पचनशक्ती वाढविणारे आहे.

दिवाळीत खाऊ नये असे काहीच नाही असे म्हणता येईल; परंतु त्या त्या व्यक्तीच्या शरीर प्रकृती वा विकृतीप्रमाणे आहार घेतल्यास दिवाळी आरोग्य देईल. मधुमेहींनी जरा गोडावर नियंत्रण ठेवायला हवे. श्‍वास त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तेलकट, जड गोड पदार्थ खाल्ल्यास त्यावर गरम पाणी घ्यावे. सुंठ, दालचिनीचा वापर आहारात अधिक असावा. थंड पदार्थ, थंड जेवण, तसेच शिळे अन्न टाळावे. गरम, ताजे अन्नपदार्थ दिवाळीत सेवन केल्यास संपूर्ण वर्षाची प्रतिकारक्षमता शरीरात निर्माण होते हे नक्की. म्हणूनच या सणाला आरोग्योत्सव म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

'मिर्झा एक्सप्रेस' काळाच्या पडद्याआड; हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन; अमरावतीत होणार अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT