Lord Mahadevas worship method  सकाळ डिजिटल टीम
संस्कृती

Shravan 2022: महादेवाला प्रिय असलेले भस्म अंगाला लावण्याचे काय फायदे आहेत ?

हिंदु संस्कृतीमध्ये हे पवित्र भस्म कपाळावर लावणे महत्वाचे मानले जाते .

सकाळ डिजिटल टीम

भस्म म्हणजे पवित्र राख.जी मंत्रजपासह एखाद्या धुनी, होम अथवा यज्ञातील विशिष्ट लाकूड, तुप,औषधी वनस्पती व काही पवित्र गोष्टीपासून तयार झालेली असते. आपल्या संस्कृतीमध्ये हे पवित्र भस्म कपाळावर लावणे महत्वाचे मानले जाते. भारतात भस्म अंगाला लावणे हे सामान्यपणे दिसून येते. एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यास त्या परिसरातील अध्यात्मिक मंडळींनी अंगाला विभूती अथवा भस्म लावलेले आपल्याला दिसते. भस्म अंगाला लावण्याबाबत असा समज आहे की भस्म अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट व दुष्ट शक्तीपासून संरक्षण होते. तुम्हाला कदाचित चंदन कपाळाला लावण्याचे धार्मिक महत्व माहित असेलच. पण चंदनाप्रमाणे भस्म अथवा पवित्र राख देखील कपाळाला लावण्याचे विशिष्ट असे फायदे आहेत.

विभूती अथवा भस्म लावण्याचे फायदे पुढील प्रमाणे-

1) डोकेदुखी कमी होते : चायनिज अॅक्युप्रेशर शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील दोन भुवयांच्या मधील भाग हा शरीरातील सर्व नसांना जोडणारा बिंदू आहे. असे मानण्यात येते. त्यामुळे त्या भागावर मसाज केल्यामुळे डोकेदुखी कमी होते, असा देखील समज आहे. दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होऊ शकते.

2) सकारात्मकपणा : तिसरा डोळा हा तुमच्या अंर्तमनाचे प्रतिनिधीत्व करीत असून तो तुमच्या मनातील विचारांच्या माध्यमातून कार्यरत असतो. तुमच्या शरीरातील या चक्रामध्ये नकारात्मक विचारांमधून नकारात्मक उर्जा शरीरात प्रवेश करत असते. मात्र पवित्र भस्म अथवा विभूती तिथे लावल्यामुळे नकारात्मक उर्जेला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखता येऊ शकते.

3) सर्दीपासून संरक्षण : भस्म अथवा राखेचा आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापर करण्यात येतो. भस्म अथवा विभूती लावल्यामुळे शरीरातील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेतली जाते व सर्दीपासून देखील संरक्षण होते.

4) शरीरातील उर्जेची कवाडे मोकळी होतात : जर तुमच्या शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवाहित होण्यामध्ये अडथळे येत असतील तर भस्म अथवा पवित्र राख लावल्याने शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवेश करणारी दारे उघडी होतात व तुम्हाला नैसर्गिक उर्जेचा पुरवठा होतो. तसेच उत्तम आरोग्यासाठी भस्म लाऊन शरीरातील सप्तचक्र देखील कार्यरत केली जातात.

5) भस्म अथवा राख सामान्यत: कपाळावर लावण्यात येते. पण एखादी व्यक्ती भस्म अथवा पवित्र राख छाती अथवा दंडावर देखील लावू शकते. यासाठीच काही लोक सर्वांगाला भस्म लावताना दिसून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Dhyaneshwar Katke Accident : बालिकेच्या अपघातात आमदार ज्ञानेश्वर कटकेंची चूक होती का? दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप, काय घडलं नेमकं?

मोठा दावा : "रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय टीम इंडिया २०२७ चा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही!"

Pune: लोणी काळभोरमध्ये स्फोट! महिला गंभीर जखमी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Live Update: बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेची विशेष तयारी

Nashik Politics : नाशिकच्या 'दुबई वॉर्ड'मध्ये राजकीय भूकंप! बालेकिल्ला असूनही मविआला उमेदवार मिळेना; कारण...

SCROLL FOR NEXT