What is the story behind Gundicha Temple and Lord Jagannath: ओडिशातील पुरी शहरात दरवर्षी होणारी ही यात्रा जगातील सर्वात मोठ्या रथ यात्रांपैकी एक आहे. हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी ही यात्रा होते. आजपासून सुरू झालेली ही यात्रा १२ दिवस चालणार असून, १५ जुलै रोजी ‘नीलाद्री विजय’ या सोहळ्याने तिचा समारोप होईल.
या यात्रेच्या निमित्ताने भगवान जगन्नाथ आपल्या बंधू बलभद्र आणि बहिण सुभद्रासह त्यांच्या मूळ मंदिरातून बाहेर पडतात आणि गुंडिचा मंदिरापर्यंत नगरप्रदक्षिणा करतात. या प्रवासात लाखो भक्त सहभागी होतात आणि रथाला ओढण्याचा सन्मान मिळवतात.
रथयात्रेपूर्वी भगवान जगन्नाथ यांना स्नान पौर्णिमेच्या दिवशी १०८ पवित्र कलशांनी गंगाजल, चंदन आणि औषधी जलाने अभिषेक केला जातो, ज्याला ‘स्नान यात्रा’ म्हणतात. या दिवशी भगवान जगन्नाथ, बलराम, सुभद्रा आणि सुदर्शनाला मंदिराच्या स्नान मंडपावर आणलं जातं आणि सार्वजनिकरित्या स्नान घालण्यात येतं.
या दीर्घ स्नानानंतर भगवान आजारी पडल्याची भावना मानली जाते आणि त्यांना पुढील १५ दिवसांसाठी विश्रांती दिली जाते, याला ‘अनासर काळ’ म्हणतात. या काळात मंदिर भाविकांसाठी बंद राहतं आणि त्यांचं दर्शन होत नाही; मात्र श्रद्धाळूजण ‘अलारनाथ’ या रूपात भगवानाचं दर्शन घेण्यासाठी अलारनाथ मंदिरात जातात. या दरम्यान भगवानावर त्यांना ५६ प्रकारच्या अन्नपदार्थांचा नेवैद्य दाखवला जातो, ज्याला छप्पन भोग असे म्हणतात. पंधराव्या दिवशी ‘नवयौवन दर्शन’ होतं, जिथे भगवान अधिक तेजस्वी आणि तरुण रूपात दर्शन देतात, आणि यानंतरच रथयात्रेला सुरुवात होते.
या यात्रेच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे भगवंतांसाठी तयार केले जाणारे तीन भव्य रथ. प्रत्येक रथ दरवर्षी नव्या लाकडापासून बनवला जातो आणि त्यात धातूंचा वापर केला जात नाही.
भगवान जगन्नाथ यांचा रथ 'नंदीघोष' (१६ चाके)
बलभद्र यांचा रथ 'तलध्वज' (१४ चाके)
सुभद्राचा रथ 'दर्पदलन' (१२ चाके)
प्रत्येक रथाची रचना, रंगसंगती आणि झेंडे वेगळे असतात. या रथांवर भगवंत बसून लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरापासून गुंडिचा मंदिराकडे प्रस्थान करतात.
गुंडिचा मंदिरात भगवान ९ दिवस वास्तव्य करतात. या ठिकाणाला 'मावशीचे घर' म्हणतात. दरम्यान, भगवानाला दररोज ५६ प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात, ज्याला 'छप्पन भोग' म्हटले जाते. यात्रेनंतर भगवान पुन्हा आपल्या मूळ मंदिरात परत जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.