संस्कृती

Diwali Festival 2021 : काय आहे वसूबारस? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

- दा. कृ. सोमण

दीपावलीचे दिवस सुरू होण्यापूर्वी गोवत्सद्वादशी- वसूबारस आणि गुरुद्वादशी येत असते. आश्विन कृष्ण द्वादशी प्रदोषकाली असेल त्यादिवशी गोवत्सद्वादशी- वसूबारस साजरी केली जाते. दोन दिवशी प्रदोषकाल व्यापिनी असेल तर पूर्वदिवसाची घ्यावी असे शास्त्र ग्रंथात सांगण्यात आले आहे. यावर्षी मंगळवार २ नोव्हेंबर २०२१ आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी ‘ गुरुद्वादशी ‘आहे. गुरुद्वादशी हा श्रीदत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवशी दत्तमंदिरात गुरूद्वादशीनिमित्त दीपोत्सव केला जातो.

गुरुचरित्रात म्हटले आहे,

आश्विन वद्य द्वादशीसी । नक्षत्र मृगराज परियेसी ।

श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥

या दिवशी नरसोबाच्या वाडीस पूजन, दीपोत्सव, कथा-कीर्तन, गुरुचरित्राची पारायणे, संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.

श्रीपाद श्रीवल्लभ

श्रीपाद श्रीवल्लभ हे १४ व्या शतकात दत्तसंप्रदायातील एक महापुरुष होऊन गेले. गुरुचरित्र ग्रंथातील पाच ते दहा अध्यायात त्यांची अवतार कथेचे वर्णन केलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म तामिळनाडूमध्ये गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव आपळराज आणि मातेचे नाव सुमता होते. त्यांना बालपणीच सिद्धी प्राप्त झाली होती. उत्तरेस जगन्नाथपुरी, काशी आणि बद्रिकेदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर ते दक्षिणेस गोकर्ण महाबळेश्वर येथे गेले. नंतर ते श्रीशैलावर गेले. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर येथे राहिले. तेथेच आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी निजानंदी गमन केले. हा दिवस गुरुद्वादशी म्हणून दत्तसंप्रदायी लोक दरवर्षी श्रद्धेने पाळीत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT