सनातन धर्मात शंकराचार्यांचे पद सर्वोच्च मानले जाते. भारतातील शंकराचार्य पदाची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली. आदि शंकराचार्यांनी भारतात चार मठ स्थापन केले होते. या चार मठांमध्ये उत्तरेला बद्रिकाश्रमाचा ज्योती मठ, दक्षिणेला शृंगेरी मठ, पूर्वेला जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ आणि पश्चिमेला द्वारकेचा शारदा मठ यांचा समावेश होतो.
या चार मठांच्या प्रमुखाला शंकराचार्य म्हणतात. संस्कृतमध्ये या मठांना पीठ म्हणतात. या मठांची स्थापना केल्यानंतर आदि शंकराचार्यांनी आपल्या चार मुख्य शिष्यांवर जबाबदारी सोपवली. तेव्हापासून भारतात शंकराचार्य परंपरा प्रस्थापित झाली. शंकराचार्य कोण असतात, भारतात किती शंकराचार्य आहेत ते जाणून घेऊया.
मान्यतेनुसार, हे पद आदि शंकराचार्यांनी सुरू केले होते. आदि शंकराचार्य हे हिंदू तत्वज्ञानी आणि धार्मिक नेते होते, ज्यांना हिंदुत्वाच्या महान प्रतिनिधींपैकी एक मानले जाते. सनातन धर्माला बळकटी देण्यासाठी आदि शंकराचार्यांनी भारतात 4 मठांची स्थापना केली. पण, सर्वप्रथम मठ म्हणजे काय हे जाणून घेऊ.
सनातन धर्मानुसार, मठ हे स्थान आहे जिथे गुरू आपल्या शिष्यांना शिक्षण आणि ज्ञान देतात. या गुरूंनी दिलेले शिक्षण हे अध्यात्मिक असते. मठात या कामांशिवाय समाजसेवा, साहित्य इत्यादी कामं असतात. शंकराचार्य कसे निवडले जातात ते जाणून घेऊया.
शंकराचार्य होण्यासाठी संन्यासी असणे आवश्यक आहे. संन्यासी होण्यासाठी घरगुती जीवनाचा त्याग करणे, मुंडन, पिंडदान करणे, रुद्राक्ष धारण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यानंतर शंकराचार्यांचे प्रमुख, आचार्य महामंडलेश्वर, प्रतिष्ठित संत यांच्या सभेची सहमती, आणि काशी विद्वत परिषदेच्या परवानगीनंतर शंकराचार्य पदवी प्राप्त होते.
1. पुरी, ओडिशातील गोवर्धन मठ, ज्यांचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती आहेत.
2. गुजरातमधील द्वारकाधाममधील शारदा मठ ज्यांचे शंकराचार्य सदानंद सरस्वती आहेत.
3. बद्रिकाश्रम, उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ, ज्यांचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आहेत.
4. रामेश्वरम, दक्षिण भारतातील शृंगेरी मठ, ज्यांचे शंकराचार्य जगद्गुरु भारती तीर्थ आहेत.
शंकराचार्य हे सनातन धर्मातील सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जातात, संपूर्ण भारतामध्ये या चार मठांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. शंकराचार्य हे भारतातील संत समुदायांमध्ये अग्रस्थानी आहेत. आता जाणून घेऊया आदि शंकराचार्य कोण होते.
प्राचीन भारतीय सनातन परंपरेच्या जडणघडणीत आणि धर्मप्रसारामध्ये आदि शंकराचार्यांचे मोठे योगदान आहे. सनातन परंपरेचा देशभर प्रसार करण्यासाठी त्यांनी भारताच्या चारही कोपऱ्यांमध्ये मठांची स्थापना केली होती. आदि शंकराचार्य हे अद्वैत वेदांताचे संस्थापक, संस्कृत विद्वान, उपनिषद व्याख्याते आणि सनातन धर्म सुधारक होते.
धार्मिक श्रद्धेनुसार त्यांना भगवान शंकराचा अवतारही मानले जात होते. त्यांनी जवळपास संपूर्ण भारत प्रवास केला. या महान व्यक्तिमत्त्वाचे आयुष्य देशाच्या उत्तर भागात गेले. या मठांची स्थापना इसवी सन पूर्व आठव्या शतकात झाल्याचे सांगितले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.