Hindu Religion  esakal
संस्कृती

Hindu Religion : हिंदू धर्मात कपाळावर टिळा का लावला जातो? जाणून घ्या नियम अन् धार्मिक महत्व

टिळा लावल्याने आरोग्य उत्तम राहते आणि मन एकाग्र आणि शांत राहण्यास मदत होते.

सकाळ ऑनलाईन टीम

Hindu Religion : सनातन धर्मात कपाळावर टिळा लावणे फार महत्वाचे मानले जाते. टिळा लावणे हिंदू परंपरेतील एक महत्वपूर्ण कार्य आहे. टिळा लावल्याशिवाय पूजा करण्याची परवानगीही नसते आणि पूजासुद्धा अपूर्ण मानली जाते.

तुम्ही कोणत्या पंथाचे आहात हेसुद्धा टिळ्याच्या माध्यमातून कळू शकते. टिळा लावल्याने आरोग्य उत्तम राहते आणि मन एकाग्र आणि शांत राहण्यास मदत होते.

टिळा लावण्याचे काही महत्वाचे नियम

  • आंघोळ न करता टिळा लावू नये.

  • आधी तुमच्या घरी स्थित देवाला टिळा लावा नंतर तुम्ही लावावा.

  • स्वत:ला अनामिकेने आणि दुसऱ्यांना अंगठ्यानेच टिळा लावावा.

टिळा लावण्याचे फायदे

  • चंदनाचा टिळा लावल्याने एकाग्रता वाढते.

  • कुंकवाचा टिळा लावल्याने आकर्षण वाढतं, आळस दूर होतो.

  • केशरी टिळा लावल्याने कुठल्याही कामात यश मिळतं, कामे मार्गी लागतात.

  • अष्टगंधाचा टिळा लावल्याने बुद्धित भर पडते.

खालील ग्रहांना मजबूत करण्यासाठी कोणता टिळा लावावा

१) सूर्य - लाल चंदनाचा टिळा अनामिका बोटाने लावा.

२) चंद्र - पांढरे चंदन करंगळीने लावा.

३) मंगळ - नारंगी शेंदूराचा टिळा अनामिका बोटाने लावा.

४) बुध - अष्ठगंधाचा टिळा करंगळीने लावा.

५) बृहस्पति - केशरी टिळा तर्जनीने लावा. (Sanskruti)

यशस्वीतेसाठी आणि शक्तीसाठी असा बनवा टिळा

लाल चंदन घ्या. आता त्याला चांदीच्या पत्रा असलेल्या काचेच्या पात्रात ठेवा. आता देवीपुढे ठेवून "ॐ दुं दुर्गाय नमः" असा २७ वेळा जप करा. आता हे चंदन देवीच्या पाऊलांवर लावा. आता हे चंदन खांद्यांवर आणि कपाळावर लावा. (Hindu Religion)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT