Why does Supreme God lord Ganesha called gajmukh explain by gaurav deshpande sakal
संस्कृती

Lord Ganesha : गणेशाला ‘गज’ मुखच का?

भगवान श्री गणेशाचे मस्तक हे गज मस्तक आहे. गणेशास दुसरे नाव ‘गजानन’, ‘गजवदन’ असे देखील आहे

सकाळ वृत्तसेवा

- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

भगवान श्री गणेशाचे मस्तक हे गज मस्तक आहे. गणेशास दुसरे नाव ‘गजानन’, ‘गजवदन’ असे देखील आहे. आता प्रश्न असा पडतो की, गणेशाला ‘गजा’चे म्हणजे हत्तीचेच मस्तक का आहे? याविषयी ब्रह्मवैवर्तपुराणात सांगितलेली कथा सर्वांना माहितच आहे. कोणत्याही कथेचा एक वाच्यार्थ असतो आणि दुसरा लक्ष्यार्थ असतो.

आता गज या शब्दाकडे वळूयात. ‘गज’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दातील ‘ग’कार हा गर्भयातना थांबविणारा आणि ‘ज’कार हा जन्ममरणविच्छेद करणारा या अर्थाने आहे. अर्थात ‘गज’ शब्दाने कैवल्यमुक्ती देणारी अशी कोणती देवता असेल तर ती भगवान गजानन ही होय. संख्याशास्त्रानुसार ‘गज’ शब्दाने ८ ही संख्या व्यक्त होते.

भारतीय संख्याशास्त्रात आकडे हे विशिष्ट शब्दाने व्यक्त करायची पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. उदा. ४ आकडा हा वेद या शब्दाने, ३ आकडा अग्नी या शब्दाने व्यक्त होतो. त्याचप्रमाणे गज शब्दाने ८ ही संख्या व्यक्त होते. आठही दिशांना जो संपूर्णपणे व्याप्त आहे, असा तो गजानन होय. त्याचप्रमाणे स्वरशास्त्रानुसार ‘गज’ शब्दातील ‘ग’कार हा ३ संख्या दर्शवितो आणि ‘ज’कार हा पण ३ संख्या दर्शवितो.

‘गज’ शब्द एकत्र लिहिल्यास ३३ ही संख्या येते. ३३ कोटी अर्थात ३३ प्रकारच्या देवतांचा अधिपती तो गजानन होय. या ३३ देवता कोणत्या ते शतपथ ब्राह्मणात सांगितलेले आहे, १२ आदित्य, ८ वसू, ११ रुद्र, २ अश्विनीकुमार मिळून ३३ देवता होतात. थोडक्यात गणपतीला ‘गज’ मस्तकच का? तर ‘गज’ शब्दाने इतके गूढ अर्थ अभिव्यक्त होतात, ते इथे घेणे अभिप्रेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT