Diwali Sakal
संस्कृती

Diwali Festival : दिवाळीच्या रात्री का खेळले जातात पत्ते? जाणून घ्या रंजक किस्सा

दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी बाजारपेठा सजल्या असून, अनेक घरांमध्ये दिवाळीसाठी स्वच्छता मोहिमदेखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, उत्तर भारतातील राज्यांमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये पत्ते खेळण्याची विचित्र पद्धत आहे. हा पत्त्यांचा डाव साधा नाही तर, एक प्रकारचा जुगारच आहे. येथे वर्षभर लोक जेवढं पत्ते खेळत नाही. तेवढे पत्त्यांचे डाव दिवळीच्या दिवसांमध्ये खेळले जातात. यामागे एक रंजक किस्सा आहे. तो रंजक किस्सा नेमका काय? हे आपण जाणून घेऊया.

असे म्हटले जाते की, दीवाळीची रात्र शगुनची रात्र मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला घरी येण्याचे आवाहन केले जाते. तर, दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे हे वर्षभर जय-पराजयाचे लक्षणं मानले जाते आणि या रात्री या डावात जिंकणाऱ्याचे नशीब वर्षभर चमकत राहते, असे मानले जाते.

याशिवाय पौराणिक कथांच्या एका कथेनुसार, दिवाळीच्या रात्री माता पार्वती आणि शिवशंकर यांनी चौसरचा खेळ खेळला होता. या खेळात माता पार्वती नेहमी विजयी होत असे. या खेळात पार्वती विजयी होत असल्याने तिला नेहमी आनंद होत असे. पार्वतीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद रहावा यासाठी शंकरदेखील या खेळात परभूत होत असे. तथापि, शेवटी जेव्हा पार्वतीला कळले की, शंकर महाराजांनी आपल्याला प्रसन्न करण्यासाठी जाणूनबुजून विजयचा त्याग केला. तेव्हा पार्वतीने भगवान शंकराचे प्रेम आणि समर्पण पाहून अत्यंत प्रसन्न झाल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT