Pitru Paksha 2022 Esakal
संस्कृती

Pitru Paksha 2022 | भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का..? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत पितृपक्ष साजरा केला जातो. या काळात घरातील पितरांचे स्मरण केले जाते. यासह पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी मोठ्याप्रमाणावर श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जातात. पितरांच्या स्मरणाचा हा पितृपक्ष नेमका भाद्रपद महिन्यातच का येतो? असा प्रश्न आपल्याला पडतो. याचे उत्तर आपण ज्योतिष अभ्यासकांकडून जाणून घेवूया.

पितृपक्षात पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी तथा पितरांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्षात श्राद्धादी कर्म केले जातात. भाद्रपद कृष्ण पक्षातच पितृपक्ष का साजरा केला जातो यावर ज्यातिष अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, पितृपक्ष साजरे करण्यामागे भारतीय कालगणना, वैदीक गणित आहे. पितरांची मुख्य देवता यम आहे. या देवतेच जे लोक आहे त्याला यम लोक असे म्हणतात. हा यमलोक अंतरिक्षामध्ये आहे. यालाचा पितृलोक असेही म्हणतात. पितृलोकाचा अधिपती हा यम आहे.

वैदीक गणिताप्रमाणे अंतरिक्षामध्ये ग्रहांच परिवलन होत असतं, त्यावेळी रवि (सुर्य) विशाखा नक्षत्रात जातो. वैदीक गणितानुसार यावेळेस केलेले कार्य हे पितृलोकाशी संबंधीत असतात. या काळात पितृ जागृत रुपाने वायु अवस्थेत पृथ्वीवर अवतरतात त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान म्हणून आपण जे श्राद्धादी पितृकर्म करतो हे त्यांना त्वरीत प्राप्त होते. त्यामुळे विशाखा नक्षत्र असताना पितृपक्ष असतो. आणि याकाळात पितरांसाठी श्राद्धादी कर्म जसे कि तर्पण, पिंडदान केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT