Navratri 2023 Esakal
संस्कृती

Navratri 2023: दुर्गापूजेसाठी देवीची मूर्ती घडवताना त्यात वेश्यांच्या दारातली माती का मिसळली जाते?

ही माती आणण्यासाठी वेश्यांची परवानगी घेतली जाते.

वैष्णवी कारंजकर

धार्मिक ग्रंथानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत मातृदेवतेच्या पूजेचा हा उत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या मूर्तींची ९ दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते. या दुर्गा मूर्ती बनवताना काही गोष्टींचा विशेष विचार केला जातो. जाणून घ्या या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी...

देशात अनेक ठिकाणी बंगाली कलाकारांनी देवीच्या मूर्ती बनवल्या आहेत. दुर्गादेवीच्या मूर्ती बनवताना त्यात वेश्यांच्या अंगणातील माती नक्कीच मिसळली जाते, असे बंगाली कलाकार सांगतात. त्याशिवाय देवीची मूर्ती बनत नाही. ही परंपरा खूप जुनी आहे आणि आजही पाळली जाते. माती आणण्यासाठी वेश्यांची परवानगी घेतली जाते.

पौराणिक कथेनुसार, एकदा काही वेश्या गंगेत स्नान करण्यासाठी जात होत्या. तेव्हा त्यांना घाटावर एक कुष्ठरोगी बसलेला दिसला. तिथून जाताना तो लोकांकडे विनवणी करत होते की कोणीतरी त्यांना गंगेत स्नान घालावे, परंतु कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. हे पाहून वेश्यांना त्याची दया आली आणि त्यांनी कुष्ठरोग्यांना गंगेत स्नान करायला लावले.

ते कुष्ठरोगी स्वतः भगवान शंकर होते. त्याच्या खऱ्या रूपात येऊन त्याने वेश्यांकडे वरदान मागायला सांगितलं. तेव्हा वेश्या म्हणाल्या, 'आमच्या अंगणातील मातीशिवाय दुर्गा मूर्ती घडवता येणार नाही.' भगवान शिवाने त्यांना हे वरदान दिले. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे, अशी मान्यता आहे.

देवीची मूर्ती घडवताना त्यात वेश्यांच्या अंगणातील माती टाकण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे मानसिक. त्यांच्या मते, जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती गणिकेच्या घरात प्रवेश करते तेव्हा तो आपले सर्व पुण्य कर्म बाहेर सोडून देतो. याच कारणामुळे वेश्यांच्या अंगणातील माती अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळेच देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी वेश्यांच्या अंगणातील मातीचा विशेष वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT