संस्कृती

करवा चौथ का करतात? जाणून घ्या कारण

यावर्षी 24 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जाणार आहे

सकाळ डिजिटल टीम

हिंदू महिलांमध्ये प्रामुख्याने करवा चौथ साजरी केली जाते. लग्न झालेल्या महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख शांती येते असे म्हटले जाते. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये मोठ्या उत्साहात करवा चौथ साजरी केली जाते. लग्न जमावे यासाठी मुली हे व्रत करतात.

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हिंदू दिनदर्शिकेनुसार, करवा चौथ पूजा विधी साजरी केली जाते. याला करक चतुर्थी असेही म्हटले जाते. या वर्षी करवा चौथ रविवार 24 ऑक्टोबर रोजी आहे. त्या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पार्वतीची पूजा करतात.पूर्ण दिवस उपवास केल्यानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडला जातो.

अशी आहे कथा

सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण वाचविले, ती कथा सगळ्यांना माहितीच आहे. वटपौर्णिमा आणि करवा चौथसाठीही हीच कथा प्रामुख्याने सांगितली जाते. दुसरीही कथा सांगितले जाते. ती म्हणजे अर्जुनाची. अर्जुन तपश्चर्येसाठी निलगिरी डोंगरावर गेला होता. त्यानंतर इतर चार पांडवांना खूप त्रास सहन करावा लागा. द्रौपदीने ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाला सांगितली. तसेच तिच्या पतीच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा मार्ग सांगितला. त्यानंतर श्रीकृष्णाने द्रौपदीला करवा चौथ व्रत करण्याचा सल्ला दिला. ते व्रत केल्याने अर्जुन सुखरूप घरी परत आला. तसेच बाकी पांडवांच्या सन्मानाला हानी पोहोचली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

SCROLL FOR NEXT