World Tribal Day esakal
संस्कृती

World Tribal Day : आदिवासी संस्कृतीचे कलात्मक चित्रण करणाऱ्या वारली चित्रकलेचा इतिहास माहितीये का?

आदिवासी लोककला, परंपरा अन् चालीरिती प्रकट करणारी चित्रकला.

धनश्री भावसार-बगाडे

History Of Warli Painting In Marathi :

महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातीतील पूरातन वारली चित्रकलेला आजच्या काळातही मोठ्याप्रमाणात पसंत केले जाते. बघायला तशी सोपी वाटणारी ही चित्रकला अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीने काढली जाते.

आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आदिम काळापासूनच मानवाने कलेचा आधार घेतला आहे. मग त्यात गायन, वादन, नृत्य आणि चित्रकलेचाही समावेश आहे. या माध्यमातून मानव स्वतःला व्यक्त करायला शिकला. शिवाय काही कलांना धार्मिक विधींचेही स्थान मिळाले आहे.

या भागांत आढळते ही कला

  • वारली चित्रकला वारली समाजाच्या संस्कृतीचा आरसा समजला जातो.

  • महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागांमध्ये तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवरच्या दादरा नगर हवेली यासारख्या भागात वारली चित्रकला आढळते.

  • नाशिक, धुळे भागांतही ही कला आढळते.

  • डहाणू आणि तलासरी हा परिसर या चित्रकलेचे केंद्रस्थान आहे.

  • वारली बरोबर महादेव कोळी या समाजातही अशी चित्रे काढली जातात.

  • ही कला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अविभाज्य भाग आहे.

  • कुडावरची चित्रकला जागतिक स्तरावर पोहचली आहे.

कुठे काढले जाते चित्र?

  • या वारली चित्रकलेसाठीचा कॅन्व्हास म्हणजे या लोकांच्या घराची भिंत. या भिंतींना कुड म्हणतात.

  • कारवींचा कुड विणला जातो. कुड शेण आणि तांबड मातीने लिपला जातो. त्यामुळे लालसर तपकिरी रंगाचा एक पोत तयार होतो.

  • फक्त पांढरा रंग या चित्रांसाठी वापरला जातो.

  • तांदळाच्या पीठात मोहाच्या झाडाचा चीक टाकून बाहरी म्हणजे बांबूच्या काडीने किंवा खजरीच्या काडीने चित्रे काढली जातात.

वारली चित्रांमध्ये चौकाला विशेष स्थान

  • वारली चित्रांमध्ये चौकाला विशेष स्थान आहे.

  • या एकाच चौकात लग्न चौक, देव चौक असतो. हा चौक प्रत्येक वारली कुटुंबाच्या घरांत पहायाला मिळतो.

  • हा एक धार्मिक विधी आहे. लग्नघरी एक-दोन दिवस चवुक लिहिला जातो. इथे चवुक काढणे नाही तर लिहिणे शब्दप्रयोग केला जातो.

  • सवाष्ण स्त्री देवाच्या नावाने घराच्या भिंतीवर पहिली देवरेघ ओढते. नंतर नवरा-नवरीच्या नावाने रेघ ओढली जाते.

  • पहिल्या चार रेषा या चार दिशांच्या सूचना देतात.

  • हा चवुक लिहिताना गीते गायली जातात.

  • चवुकच्या केंद्रस्थानी पालघट देवी असते. चित्राच्या सभोवती नक्षीकाम असते. बाशिंगामधल्या काही गोष्टी या नक्षीत असतात.

वारली चित्रांमध्ये चित्रकथा

  • काही चित्रकारांनी वारली चित्रांमध्ये चित्रकथाही रेखाटल्या आहेत. या कथा त्यांच्या समाजात परंपरेने चालत आल्या आहेत.

  • यात बेलकडाची, सोनालू बायची, मुगली आणि कोल्याची, उडता वारू, महाप्रलयाची गोष्ट या लोककथा साकारले जातात. पण त्या तुम्हाला माहित असतील तरच त्याचा अर्थ समजतो.

  • छोट्या-छोट्या प्रतिमा हे वारली चित्रकलेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

  • चौकोन, त्रिकोण, वर्तुळ या आकारांत सर्व अभिव्यक्ती असतात.

  • यात बैल छोटा तर विंचू मोठा, छोट्या झाडावर मोठा पक्षी असतो. पण यामुळे सौंदर्याला बाधा येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT