1 dead five injured after car falls off Bharat Nagar flyover in Hyderabad 
देश

फ्लायओव्हरवरून मोटार खाली पडली, एकाचा मृत्यू तर पाच जखमी; व्हिडिओ पाहाच

वृत्तसंस्था

हैद्राबाद : एका २२ वर्षीय तरुणाचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना हैद्राबादमध्ये घडली आहे. या अपघातात आणखी ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हैद्राबादमधील भरतनगर फ्लायओव्हरवरून कार खाली पडल्याने हा अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलावरून जात असताना कार ही वेगात होती आणि कारचा वेग न आवरल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात आज (ता. १८) सकाळी झाला असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ड्रायव्हर शेजारी बसलेल्या सोहेल नामक व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरचे नाव सुनिल असून त्याने गाडी चालवत असताना अतिमद्यसेवन केले होते.

हा अपघात सकाळी २:३० च्या दरम्यान झाला असून कार भरतनगरकडून एरगंडाकडे चालली होती. यावेळी गाडी पुलावरून थेट खाली कोसळली यावेळी पुलाखाली काही कामगार काम करत असल्याने अपघात झाल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT