Lok Sabha Election Esakal
देश

Lok Sabha Election: 'दोन बायका असणाऱ्यांना 2 लाख रुपये देऊ'; निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्याचं आश्वासन.. राजकारण तापलं

Lok Sabha Election: मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी कांतीलाल भुरिया यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले- भुरिया यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे की दोन बायका असलेल्या व्यक्तीला दुप्पट (1 लाख रुपयांची आर्थिक मदत) मिळेल.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष मतदारांना अनेक आश्वासने देताना दिसतात. अशातच काँग्रेसने महिलांसाठी अनेक योजना आणण्याचे आश्वासन या निवडणुकीत दिले आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील रतलाम येथील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कांतीलाल भुरिया यांनी गुरुवारी एका सभेला संबोधित करताना पक्षाने प्रस्तावित केलेल्या 'महालक्ष्मी योजने'बाबत अजब दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

भुरिया म्हणाले की, काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या जाहिरनामा पत्रात महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. याअंतर्गत आमचे सरकार आल्यास आम्ही गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक 1 लाख रुपये देऊ आणि ज्यांना दोन बायका आहेत त्यांना 2 लाख रुपये मिळतील.

या विधानावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले कांतीलाल भुरिया (73) यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. सैलाना येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना भुरिया म्हणाले, 'आमच्या जाहीरनाम्यात प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल. ज्या व्यक्तीला दोन बायका आहेत, त्या दोघीनांही या योजनेत समाविष्ट केले जाईल.

जितू पटवारी यांनी भुरिया यांच्या वक्तव्याचे केले समर्थन

याच रॅलीत बोलताना मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी भुरिया यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले, 'भुरिया जी यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. दोन बायका असलेल्या व्यक्तीला दुप्पट रक्कम (1 लाख रुपयांची आर्थिक मदत) मिळेल.' काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार, महालक्ष्मी योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) महिलांना या श्रेणीतून बाहेर येईपर्यंत दरमहा 8500 रुपये मिळतील, जे वार्षिक 102000 रुपये आहे.

कांतीलाल भुरिया यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आदिवासींचा अपमान केल्याचा आरोप केला आणि भाजपच्या एका नेत्याने सिधी येथील आदिवासीवर लघवी केली तेव्हा ते गप्प राहिले असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. भुरिया मध्य प्रदेशचे वनमंत्री नागर सिंह चौहान यांच्या पत्नी अनिता चौहान यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी रतलाममध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, खासदार भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी भुरिया यांच्या वक्तव्याची क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपलोड केली आणि निवडणूक आयोगाला टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेस बहुसंख्य हिंदूंचा अपमान करत आहे: भाजप

कांतीलाल भुरिया यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रतलाम मतदारसंघातून विजय मिळवला होता, परंतु 2014 मध्ये भाजपच्या दिलीप सिंह भुरिया यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. 2015 मध्ये दिलीप सिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते कांतीलाल पुन्हा एकदा येथून विजयी झाले. पण 2019 मध्ये त्यांचा पुन्हा भाजपच्या गुमानसिंग डामोर यांच्याकडून पराभव झाला. भुरिया यांच्या 'दोन बायका असणाऱ्यांना 2 लाख' या विधानावर टीका करत भाजपने काँग्रेसवर एका विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण केल्याचा आरोप केला आहे.

भाजपचे राज्य माध्यम प्रभारी आशिष अग्रवाल यांनी जितू पटवारी, दिग्विजय सिंह आणि कांतीलाल भुरिया यांच्यावर मंचावरून बहुसंख्य हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT