10 died after passenger taxi rolled down a deep gorge on Jammu-Srinagar national highway
10 died after passenger taxi rolled down a deep gorge on Jammu-Srinagar national highway 
देश

Jammu-Kashmir Road Accident : प्रवाशांना घेऊन जाणारी कॅब दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

रोहित कणसे

Accident On Jammu Srinagar National Highway: जम्मू-काश्मीर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला. रामबन जवळ जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवेवर कॅब दरीत कोसळल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे. ही कॅब प्रवाशांना घेऊन जम्मूहून श्रीनगरकडे जात होती. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर नॅशनल हायवेवर झालेला हा अपघात रामबन येथे बॅटरी चश्मा जवळ झाला. स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि रामबन येथून सिव्हील क्विक रिस्पॉन्स टीम तत्काळ घटनास्थळावर पोहचली. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला, सव्वा एकच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. तवेरा कार असलेली कॅब प्रवाशांसह काश्मीरला जात होती, मात्र वाटेत अचानक ही दुर्घटना घटना घडली. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कॅब ३०० मीटर खोल दरीत कोसळली. दरम्यान बचाव कार्यादरम्यान बाहेर काढण्यात आलेले मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या अपघातानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी चष्माजवळ एक प्रवासी टॅक्सी खोल दरीत कोसळली ज्यात १० जणांचा मृत्यू झाला. या भीषण रस्ता अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, बसीर-उल-हक डीसी रामबन यांच्याशी बोललो. पोलीस, SDRF आणि सिव्हील क्यूआरटी घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे. मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT