IPL 2024, RCB vs KKR: बेंगळुरूला घरच्याच मैदानावर कोलकाताचं आव्हान का ठरणार अवघड? ही आहेत 3 कारणे

IPL 2024, RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला कोलकाता नाईट रायडर्स संघ एम चिन्नास्वामी स्टेडमयवर वरचढ का ठरू शकतो, याचा घेतलेला आढावा.
KKR vs RCB | IPL
KKR vs RCB | IPLSakal

IPL 2024, RCB vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 10 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान, या सामन्यातून दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील.

बेंगळुरूने यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत एक सामना जिंकला आहे आणि एक सामना पराभूत झाला आहे. त्यांनी घरच्या मैदानात पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकला होता.

दरम्यान, पंजाबविरुद्ध घरच्या मैदानात रोमांचक विजय मिळवणाऱ्या बेंगळुरू संघाला कोलकाता संघ मात्र तगडे आव्हान देऊ शकतात. कोलकाताने आत्तापर्यंत एक सामना जिंकला आहे. दरम्यान, कोलकाता बेंगळुरूला वरचढ का ठरू शकतात, याची काही कारणे जाणून घेऊ.

KKR vs RCB | IPL
Riyan Parag RR vs DC : राजस्थानचा 'पांढरा हत्ती' कामाला आला; रियाननं गेलेला सामना खेचून आणला

फलंदाजीतील सखोलता

बेंगळुरूची फलंदाजीची ताकद ही वरची फळी आणि मधली फळी आहे. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल असे नावाजलेले फलंदाज त्यांच्या फलंदाजी फळीत आहे. तसेच त्यांना साथ देण्यासाठी सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेले अनुज रावत, दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदार आहे.

परंतु, असे असले तरी कोलकाता संघातही फलंदाजीची सखोलता आहे. फिल सॉल्ट, वेंकटेश अय्यर, कर्णधार श्रेयस अय्यर, सुनील नारायण, नितीश राणा हे फलंदाज वरची आणि मधली फळी तर सांभाळतातच परंतु, अखेरीस तुफानी खेळ करू शकणारे आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग हे फलंदाजही कोलकाताच्या ताफ्यात आहेत.

त्यातच चिन्नास्वामी स्टेडियम छोटे असल्याने तिथे चौकार - षटकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याचाच फायदा रसेल आणि रिंकू सिंग घेऊ शकतात. त्यांना रोखण्यात जर बेंगळुरूला यश आले नाही, तर ते संघासाठी महागडे ठरू शकते.

KKR vs RCB | IPL
Ravindra Jadeja: 'साक्षी भाभीनंतर मीच असा व्यक्ती ज्याला...', धोनीबद्दल हे काय म्हणाला जडेजा?

कोलकाताची सरस गोलंदाजी

बेंगळुरूला यंदाच्या हंगामात सर्वात मोठे आव्हान आहे, ते गोलंदाजीचे. त्यांच्याकडे फलंदाजीत अनुभव असला, तरी त्यांनी गोलंदाजी फारशी अनुभवी नाही. तसेच एका उत्तम फिरकीपटूची कमी बेंगळुरूला भासू शकते. फिरकी गोलंदाजीसाठी ते मयंक डागरला संधी देऊ शकतात.

याबरोबरच ग्लेन मॅक्सवेलही त्याला साथ देऊ शकतो. पण यातुलनेत कोलकाताची गोलंदाजी सरस आहे. त्यांच्याकडे सुनील नारायण आणि वरूण चक्रवर्ती हे फिरकपटू आहेत. तसेच सुयश शर्मा किंवा चेतन साकारिया यांनाही संधी मिळू शकते.

मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांना रसेलचीही गोलंदाजीत साथ मिळू शकते. एकूणच कोलकाताकडे गोलंदाजांचे चांगले पर्याय आहेत.

आत्तापर्यंतची आकडेवारीत कोलकाता वरचढ

कोलकाता आणि बेंगळुरू यांच्यात आत्तापर्यंत 32 सामने झाले आहेत. यातील 18 वेळा कोलकाताने विजय मिळवला असून 14 सामने बेंगळुरूने जिंकले आहेत. तसेच चिन्नास्वामी स्टेडियमवर 11 वेळा हे दोन संघ आमने-सामने आले असून 7 वेळा कोलकाताने विजय मिळवला आहे, तर 4 वेळा बेंगळुरूने विजय मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com