BJP first list esakal
देश

BJP first list: मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप, त्यांना पुन्हा उमेदवारी; भाजपच्या पहिल्या यादीतील १० महत्त्वाचे मुद्दे

BJP First List Lok Sabha : भाजपने लोकसभेसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ३४ मंत्र्यांचा समावेश आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

कार्तिक पुजारी

BJP First List Lok Sabha- भाजपने लोकसभेसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ३४ मंत्र्यांचा समावेश आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यादीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचाही समावेश आहे. ते राजस्थानच्या कोटामधून निवडणुका लढवतील. (important points in BJP first list of lok sabha election candidate selection)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या रिंगणात आणण्यात आले आहे. त्यांना विदिशा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने उमेदवारी देताना जिंकून येईल त्याला तिकीट अशा रणनीतीचा वापर केला आहे. तसेच जातीचं समीकरण देखील साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाष्ट्रातून अद्याप एकाही जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

भाजपच्या पहिल्या यादीतील १० ठळक मुद्दे पाहुया

१. सध्याच्या ३३ खासदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात प्रज्ञा ठाकूर, हर्षवर्धन, रमेश बिगुरी, मिनाक्षी लेखी, रामेश्वरम तेली, केपी यादव, गौतम गंभीर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

२. कोणत्या राज्यातीत किती उमेदवारांची नावे जाहीर

उत्तर प्रदेश- ५१

पश्चिम बंगाल - २०

मध्य प्रदेश – २४

गुजरात – १५

राजस्थान – १५

केरळ – १२

तेलंगणा – ९

आसाम – ११ (एकूण जागा १४)

झारखंड – ११

छत्तीसगड – ११

दिल्ली – ५

जम्मू – काश्मीर – २

उत्तराखंड – ३

अरुणचाल प्रदेश – २

गोवा – १

त्रिपुरा – १

अंदमान – निकोबार – १

दीव आणि दमण -१

३. पहिल्या यादीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांची फिल्डिंग लावली आहे. यात मनसुख मंडाविया, जितेंद्र सिंग, सर्बानंद सोनोवाल, गजेंद्रा शेखावत, भुपेंद्रा यादव, जी किशन रेड्डी, किरेन रिजेजू, ज्योतिरादित्य शिंदे, राजिव चंद्रेशखर, अर्जुन राम मेघवाल आणि अर्जुन मुंडा यांना संधी देण्यात आली आहे.

४. भाजपने दिल्लीमध्ये मोठे बदल केले आहेत. रमेश बिदुऱी, पर्वेश वर्मा, मिनाक्षी लेखी, हर्ष वर्धन यांचे तिकीट कापण्यात आलं आहे.त्याऐवजी प्रविण खांडेलवाल यांना चांदणी चौक, कलमजीत सेहरावत वेस्ट दिल्ली, सुष्ममा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना नवी दिल्ली आणि रामवीर सिंग बिधुरींना दक्षिण दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

५. पश्चिम बंगालच्या असनसोल मतदारसंघातून भाजपने भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग याला उमेदवाली दिली आहे

६. भाजपच्या यादीमध्ये २८ महिला आणि २७ तरुण चेहरे आहेत. २८ एससी, १८ एसटी, ५७ ओबीसी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे झारखंडमध्ये काँग्रेसच्या माजी खासदार गिता कोडा यांना सिंघभूम (एसटीसाठी राखीव) उमेदवारी देण्यात आलीये.

७. पॅरालिम्पियन देवेंद्र झांजरिया यांना राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. झांजरिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. त्यामुळे भाजपने त्यांचा सन्मान केल्याचं बोललं जातंय.

८. मध्य प्रदेशातून भाजपने प्रसिद्ध चेहरे ज्योतिरादित्य शिंदे आणि शिवराज सिंह चौहान यांना संधी दिली आहे. शिवराज यांना मुख्यमंत्रीपद डावलण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना लोकसभेवर पाठवले जाण्याची शक्यता होती. प्रज्ञा ठाकूर यांचा पत्ता कट करण्यात आलाय.

९. उत्तर प्रदेशातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हेमा मालिनी, रवी किशन, महेश शर्मा, एसपीएस बघेल, साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

१०. काँग्रेस नेते शशी थरुर यांना टक्कर देण्यासाठी तीन वेळा राज्यसभा खासदार असलेले राजीव चंद्रशेखर यांना पुढे करण्यात आलं आहे. थरुर केरळातील तिरुअनंतपुरममधून तीनवेळा लोकसभा खासदार आहेत. केरळमधून ए. के. अँटनींच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली आहे.

११. सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे अजय मिश्रा तेनी यांना खेरी मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा तेनी याला लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी तुरुंगवास झाला होता. शेतकरी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT