Pune Airport
Pune Airport Esakal
देश

Omicron : बंगळुरूनंतर मेरठमध्ये 10 परदेशी पाहुणे बेपत्ता

सकाळ डिजिटल टीम

मेरठ : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron Variant) संपूर्ण जगाची चिंता वाढवली असताना आता विदेशातून भारतात दाखल झालेल्या प्रवासी चुकीचा नंबर देण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांचा शोध नेमका कसा लावायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. मेरठमध्ये (Meerut) दाखल झालेल्या 297 प्रवाशांपैकी 13 प्रवाशांनी प्रशासनाला चुकीचे नंबर आणि पत्ते दिल्यामुळे त्यांचा नेमका शोध कसा लावायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मोहन यांनी दिली आहे.

एकीकडे देशात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढू नये याकरता केंद्राकडून तसेच राज्यांकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. मात्र, प्रवाशांनीच जर चुकीचा नंबर आणि पत्ते दिले तर करायचे काय असे एक ना अनेक प्रश्न यामुळे प्रशासनासमोर उपस्थित झाले आहेत. दरम्यान, प्रवाशांनी दिलेली माहिती पुढील तपासासाठी स्थानिक गुप्तचर विभागाकडे देण्याती आली आहे, असे डॉ. अखिलेश मोहन यांनी सांगितले.

अफ्रिकन देशातील 10 नागरिक बंगळुरूमध्ये बेपत्ता

आफ्रिकन देशांमधून बेंगळुरूला (Bangalore) आलेले किमान 10 आंतरराष्ट्रीय प्रवासी बेपत्ता झाले आहेत, असे बृहत बेंगलुरु महानगर पालीकेकडून (BBMP) शुक्रवारी सांगण्यात आले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य अधिकारी आता या परदेशी लोकांचा शोध घेत आहेत.

BBMP आयुक्त गौरव गुप्ता यांनी सांगीतले की 'ट्रॅकिंग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि आम्ही ते करत राहू. जर कोणी फोनला उत्तर देत नसेल तर एक स्टॅंडर्ड प्रोटोकॉल आहे आणि आम्ही त्याचे पालन करू' गुप्ता यांनी लोकांना सतर्क राहण्यास आणि सुरक्षा उपायांचा अवलंब करण्यास सांगितले.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर म्हणाले, "दक्षिण आफ्रिकेत (South Africa)ओमिक्रॉन सापडल्यानंतर 57 प्रवासी बेंगळुरूला आले. BBMP या 57 पैकी 10 प्रवाशांना शोधू शकली नाही. त्यांचा फोन बंद आहे आणि दिलेल्या पत्त्यावर ते उपलब्ध नाहीत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT