Accident News esakal
देश

Accident: बसच्या भीषण अपघातात १२ जण ठार ८ जखमी

ओडिशा येथे मोठी दुर्घटना घडली

धनश्री ओतारी

ओडिशा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. गंजम जिल्ह्यात दोन बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 12 जण ठार ८ जखमी झाले आहेत. Odisha 12 people died and 8 injured in a bus accident in Ganjam district, last night

सरकारी बस आणि खासगी बस मध्ये दिगपहाडीजवळ अपघात झाला. मध्यरात्री उशिरा ही घटना घडली. जखमींना बेरहामपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. (Latest Marathi News)

ओडिशा सरकारने जखमींना 30 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 6 पुरुष, 4 महिला आणि 2 अल्पवयीन आहेत. (Latest Marathi News)

बेरहामपूरचे एसपी सरवण विवेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे एक वाजता झाला. दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. ओएसआरटीसी बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले बहुतांश प्रवासी खासगी बसमधील होते.

ओएसआरटीसीची बस रायगडाहून भुवनेश्वरला जात होती, तर खासगी बस बेरहामपूरहून जिल्ह्यातील खंडादेउली गावातून लग्नाची पार्टी घेऊन परतत होती. दिगपहांडी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अनेक प्रवाशांची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT