narendra modi 
देश

स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट, 100 लाख कोटींच्या योजनेची घोषणा

कार्तिक पुजारी

Gatishakti Scheme- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधानी मोदी यांनी 'प्रधानमंत्री गति शक्ति योजने'ची घोषणा केलीये. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी असणार आहे. लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मोदींनी सांगितल्यानुसार, ही योजना लवकरच आणली जाणार आहे. ही योजना देशासाठी मास्टर प्लॅन ठरेल असं ते म्हणाले आहेत. (Independence Day 2021 Latest News)

आधुनिकीकरणासाठी भारताला पायाभूत सुविधांची निर्मिती करुन सर्वांगणी विकास साधता आला पाहिजे. यामध्ये गतीशक्ती योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मोदींनी सांगितले. देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. दळणवळणासाठी गतीशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

छोट्या शेतकऱ्यांची महत्त्वाची घोषणा करणार

देशात 80 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. सुरुवातील देशांमध्ये ज्या नीती बनल्या त्या छोट्या शेतकऱ्यांना केंद्र स्थानी ठेवून बनल्या नाहीत. त्यामुळे त्यांना लक्षात घेऊन एक निर्णय घेतला जाणार आहे. छोटा शेतकरी देशाचा अभिमान बनावा असा आपला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

छोटा किसान बने देश की शान' हा आपला नारा आहे. हे आपले स्वप्न आहे. येत्या काळात आपण शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढवणार आहोत. शेतकऱ्यांना नव्या सुविधा पुरवल्या जातील. किसान रेल सध्या देशातील 70 पेक्षा अधिक रेल्वे मार्गावरुन धावत आहे, असं मोदी म्हणाले. आपण पाहतोय की आपले गाव बदलत आहेत. गेल्या काही वर्षात वीज, रस्ते गावात पोहोचले आहेत. सध्या ऑपटिकल फायबर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इंटरनेट गावात पोहोचले आहे. डिजिटल उद्योजक आता गावातही तयार होत आहेत, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT