नवी दिल्ली- चांदणी चौकातून खरेदी केलेला १०० रुपयांचा हातोडा आणि १३०० रुपयांचा डिस्क कटर खरेदी करुन आरोपीने तब्बल २५ कोटींच्या दागिन्यांची चोरी केली आहे. दागिन्यांचे शोरुम लुटून २५ कोटींचे दागिने लांबवण्यात आल्याची घटना दिल्लीच्या जयपुरामध्ये घडली होती. त्यामुळे एखच खळबळ उडाली. कारण दिल्लीच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील ही सर्वाच मोठी चोरीची घटना होती.
लोकेश श्रीवास या छत्तीसगडच्या आरोपीने एकट्याने हा कारनामा केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेशने दिल्लीमध्ये दोन चोऱ्या केल्या. यासाठी त्याने चांदणी चौकातून १०० रुपयांचा एक हातोडा खरेदी केला. तसेच जीबी रोडवरुन १३०० रुपयांचा डिस्क कटर विकत घेतला. स्क्रूड्रायव्हर आणि पक्कड त्याने घरुन आणली होती. या साहित्यांच्या मदतीने त्याने २५ कोटींची चोरी केली.
भोगल भागातील उमराव दागिन्यांच्या शोरुममध्ये तो लागून असलेल्या इमारतीच्या मदतीने पोहोचला. छतावरुन तो तळमजल्यापर्यंत पोहोचला. त्याने रात्रभर दर्शनी भागात ठेवलेले दागिने चोरले. महत्त्वाचे दागिने एका मजबूत खोलीमध्ये ठेवले होते. त्याने या खोलीला आपल्याकडील साहित्याने छिद्र पाडले. याठिकाणी असलेले सीसीटीव्ही देखील त्याने निकामी केले होते.
आरोपीने अगदी नियोजनबद्धपणे ही चोरी पार पाडली होती. पण, शेवटी पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. लोकेश पळून गेला असता तर ही मोठी घटना ठरली असती. पण,छत्तीसगडमधील एकाने पोलिसांना टीप दिली. त्यामुळे लोकेश पकडला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.