Hyderabad Fire Incident
Hyderabad Fire Incident ANI
देश

हैदराबादेत अग्नितांडव, झोपेतच ११ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये (Hyderabad Fire News) बुधवारी आगीची मोठी घटना समोर आली आहे. हैदराबादमधील भोईगुडा (Bhoigua Hyderabad) येथे एका भंगार दुकानाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. या आगीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

हैदराबादेतील भोईगुडा परिसरातील भंगार दुकानाला बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये झोपेत असलेल्या ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकाला स्वतःचा जीव वाचविण्यात यश आलं. पण तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व कामगार बिहार येथील असल्याची माहिती मिळतेय. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे गांधी नगरचे पोलिस अधिकारी मोहन राव यांनी सांगितले.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच तपशील सादर केला जाईल, असं हैदराबादचे जिल्हाधिकारी एल. शर्मन यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा -

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिकंदराबादमधील भोईगुडा भंगार दुकानाला लागलेल्या आगीत बिहारमधील कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि मुख्य सचिवांना या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे मृतदेह बिहारला पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT